शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

लोकसंख्या, सदस्यसंख्या बदलल्याने 'इच्छुकांना' पालिकेत बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:45 IST

२०२२ च्या नियोजनापेक्षा सदस्यसंख्या आठने घटली-प्रभाग रचनेसाठी सॅटेलाईट, गुगलअर्थचा होणार वापर; पालिका निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर यांची माहिती

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिकेत १७३ सदस्य निश्चित केली होती. मात्र, महायुती सरकारने चार सदस्यीय प्रभागरचनेचा पर्याय स्वीकारल्याने आणि लोकसंख्येचा निकष बदलल्याने सदस्यसंख्या आठने कमी होणार आहे. याचा फटका इच्छुकांना बसणार असून सदस्यसंख्या १६५ राहील दरम्यान, गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख व उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांना आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीने २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या प्रभाग रचनेमध्ये समाविष्ट ३४ गावांचा समावेश होता. त्यावेळी ३५ लाख ५६ हजार ८२४ लोकसंख्या निश्चित करून सदस्यसंख्या १७३ आणि प्रभाग संख्या ५८ निश्चित केली होती. आता फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे वगळून ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्या आणि १६५ सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. महायुती सरकारने चारसदस्यीय प्रभागरचना स्वीकारल्याने ३१ लाख लोकसंख्येसाठी १६१ सदस्य व पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य असा बेस निश्चित केला. त्यामुळे सदस्यसंख्या आठने कमी होणार आहे.महापालिकेच्या जुन्या हद्दीमध्ये सहा हजार ४०० प्रगणक गट आहेत. हे गट न फोडता नगरविकास विभागाने दिलेल्या गाइडलाइन्सप्रमाणे नाले, ओढे, नदी, डोंगर या नैसर्गिक सीमारेषांसोबतच मोठे रस्ते यांच्या सीमारेषा ग्राह्य धरून गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागरचना निश्चित केली जाणार आहे. समाविष्ट गावांच्या प्रगणक गटांची यादी अद्याप उपलब्ध झालेली नाही. ती जिल्हा प्रशासनाकडून लवकरच मिळेल. पारदर्शकतेसाठी प्रगणक गटांची माहिती पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल, असे काटकर यांनी नमूद केले.आकडेवारी काय सांगते.....पुणे महापालिका २०१७ ची परिस्थितीलोकसंख्या - ३१ लाख ३२ हजार १४३मतदार संख्या - २६ लाख ३४ हजार ८००चार सदस्यीय प्रभाग रचनासदस्य संख्या - १६२, अकरा गावे समाविष्ट झाल्यानंतर २ सदस्यांची भर पडून १६४ सदस्य.प्रभाग संख्या - चार सदस्यीय ३९ व त्रिसदस्यीय २ प्रभाग. समाविष्ट ११ गावांचा लोकसंख्येनुसार दोन सदस्यीय एक प्रभाग.मतदान केंद्र - ३ हजार ४३१इव्हीएमची संख्या - ३ हजार ७००खर्च २० कोटी ६७ लाख रुपये.पुणे महापालिकेची २०२२ ची परिस्थितीलोकसंख्या (समाविष्ट ३४ गावांसह) -३५ लाख ५६ हजार ८२४तीन सदस्यीय प्रभाग रचनासदस्य संख्या - १७३प्रभाग संख्या - ५८सध्याची परिस्थिती -लोकसंख्या (फुरसुंगी व उरुळी देवाची वगळून) - ३४ लाख ८१ हजार ३५९चार सदस्यीय प्रभाग रचनासदस्य संख्या - १६५एका प्रभागाची लोकसंख्या - सरासरी ८४ हजार. कमीत कमी ७५ हजार तर जास्तीत जास्त २२ हजार.निवडणुकीच्या कामासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्तीमहापालिका आयुक्तांनी प्रभाग रचना तयार करून ती निवडणूक आयोगाच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना कामासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात अभियंते, टंकलेखक, लिपिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024