शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : सोशल मीडियामुळे हरवलेली आई मिळाली, दीड महिन्यानंतर कुटुंबियांशी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:50 IST

फेसबुक युजरच्या सतर्कतेमुळे कुटुंबापासून दुरावलेली आईची महिनाभरानंतर मुलांशी भेट...

बारामती  : अलीकडे सोशल मिडीयावर व्हारल होत असलेल्या पोस्टमुळे याबाबत टीकेचा स्वर उंचावत असताना यामुळे काही चांगल्या गोष्टीही घडतात.  एका  फेसबुक युजर डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे  कुटुंबापासून दुरावलेली आईची महिनाभरानंतर मुलांशी भेट झाली. त्या ज्येष्ठ महिलेचा तिचे  कुटुंबीय  दीड महिन्यांपासून शोध घेत होते.

निर्मला नामदेव फुले (वय ५६, रा. माळेवाडी अकलुज, ता.माळशिरस, जि सोलापूर) असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्या त्यांच्या घरातून २८ डिसेंबर २०१७ ला निघून गेल्या होत्या. त्यानंतर निर्मला यांचा कुटुंबियांनी शोध घेतला. मात्र, त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने फेसबुकवर पोस्ट केली. यात आईचे वर्णनासहित छायाचित्र टाकले होते. 

भवानीनगर (ता.इंदापूर) येथील डॉ. महेश सदाशिव अंकुशे यांचा राजुरी (ता.पुरंदर) येथे दवाखाना आहे. ते रविवारी (दि.११) दौंड येथे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर केडगाव (ता.दौंड) येथे त्यांना एक महिला दिसली.  त्यांना सदर महिलेस कुठेतरी पाहिल्याचा भास झाला.  त्यांचे छायाचित्र फेसबुकवर पाहिल्याचे पुसटसे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचे फेसबुक अकाउंट चाळले.  त्यावेळी निर्मला यांच्याबाबत त्यांना माहिती मिळाली. त्यांनी फेसबुक वरील फोटो व सदर महिलचे वर्णन जुळवले असता त्याच आहेत, असे लक्षात आले. त्यांनी निर्मला यांच्या  कुटुंबियांशी संपर्क साधला. निर्मला यांचे छायाचित्र त्यांच्या मुलाच्या व्हॉट्सअपवर पाठविले. त्यानंतर ‘ही आमचीच आई आहे, आम्ही तिला न्यायला येतो, असे त्यांनी डॉ अंकुशे यांना मोबाईलवर कळविले. त्यानंतर डॉ. अंकुशे यांनी चार तास त्यांच्यावर लक्ष ठेवत कुटुंबियांची वाट पाहिली. त्यानंतर निर्मला यांचे पती, मुलगा डॉ. निलेश फुले, त्यांची मुलगी, जावई आदी नातेवाईक त्या ठिकाणी पोहचले. जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर  हरवलेल्या आईला पाहून फुले भावंडांना अश्रू अनावर झाले. फुले कुटुंबिय निशब्द झाले होते. दुरावलेल्या मायलेकांची भेट पाहुन डॉ .अंकुशे यांच्यासह उपस्थितांचे देखील डोळे पाणावले. 

 ...‘सोशल मिडीया इज ग्रेट’

 निर्मला यांचे चिरंजीव डॉ. निलेश फुले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, ‘सोशल मिडिया इज ग्रेट’. एक महिन्यापूर्वी माझी आई तिच्या भोळसर स्वभावामुळे निघून गेली होती. आम्ही महिनाभर तिचा शोध घेत होतो. पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली होती. तिचा शोध लागत नसल्याने आम्ही सर्वजण तणावात होतो. शेवटी सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे सुरवातीला व्हॉट्सअप आणि नंतर फेसबुकवर तिचे छायाचित्र, माहिती पोस्ट  केली. अखेर सोशल मिडीयामुळे आमच्या आईची भेट झाली.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया