शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पुण्यात गिरीश बापटांचा मोहन जोशींना धोबीपछाड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 23:21 IST

महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत होते.

पुणेःकाँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 2014पासून शत-प्रतिशत कमळ फुलले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी लढत बघायला मिळाली. वाहतूक, वाढते शहरीकरण, मेट्रो, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली. महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत होते. मात्र, यात बापटांनी रात्री उशिरा पर्यंत २० फेरीपर्यंत तब्बल ३,०९८४८  इतक्या विजयी मताधिक्क्याने धोबीपछाड दिला. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात २० फेरीनंतर गिरीश बापट यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ६,०४६८७ मते मिळाली असून मोहन जोशी यांच्या पारड्यात २, ९४, ८३९ मते मिळाली आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी 5 लाख 69 हजार 825  मतांसह विजय साकारला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 056 मते मिळाली होती. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले होते.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट