शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Pune Local Body Election Result 2025: पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:14 IST

Pune Local Body Election Result 2025 पुण्यात काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत असताना, शिंदे गटाकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार असल्याने त्यांची ताकद मर्यादित असल्याचे चित्र होते

पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १६१ जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. भाजप ९९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर यापूर्वी कधीही प्रमुख शर्यतीत नसलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार मुसंडी मारत ५१ जागा जिंकून तिसरे स्थान मिळवले आहे.

या निकालामागे महायुतीतील अंतर्गत संघर्ष महत्त्वाचा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने अनेक ठिकाणी ‘आम्हीच मोठे’ अशी भूमिका घेत थेट राष्ट्रवादीशी संघर्ष उभा केला. परिणामी मित्र पक्षांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत भाजपलाच धक्का देत त्याच्या जागा कमी करण्यात यश मिळवले.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अलीकडील काळात भाजपने राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची ताकद कमी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे यांना पक्षप्रवेश देत भाजपने राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला. अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनाही भाजपच्या गोटात आणण्याची मोहीम सुरू होती. अशाच पार्श्वभूमीवर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या.

सुरुवातीला महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत असताना, शिंदे गटाकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार असल्याने त्यांची ताकद मर्यादित असल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला. दोन माजी आमदारांनीही ‘आम्हीच दिशा ठरवणार’ अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी वरिष्ठ पातळीवरही स्वतंत्र लढण्याची भूमिका स्वीकारली गेली. भाजपने मित्रपक्षांना मागे टाकण्याचे मनसुबे आखले; मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसून आले.

नगराध्यक्ष मिळाले; पण बहुमत नाही

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदे मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, चार नगरपरिषदांमध्ये अशी परिस्थिती आहे की, नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असला तरी बहुमत अन्य पक्षांकडे आहे. विशेषतः शिरूर, भोर, माळेगाव आणि दौंडमध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असला, तरी माळेगाव वगळता उर्वरित ठिकाणी भाजपचे संख्याबळ अधिक आहे. माळेगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीशी युती केली होती; तरीही अपक्षांनी पाच जागा जिंकत जोरदार धक्का दिला.

महेश लांडगे यांची जादू फिकी

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भाजपने शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, या मतदारसंघातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. आळंदी वगळता जुन्नर, राजगुरूनगर, चाकण आदी ठिकाणी भाजपला अल्प संख्येवर समाधान मानावे लागले. शिरूरमध्ये माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांनी भाजपसाठी मोठी धावपळ केली. उत्तर पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि जयश्री पलांडे यांचीही त्यांना साथ मिळाली. तरीही निकाल पाहता आमदार महेश लांडगे यांची राजकीय जादू काहीशी कमी झाल्याचे दिसून आले.

झेडपीसाठी पुढील लढाई

नगरपालिका निवडणुकांतील यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उत्साह संचारला आहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपही जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

इंदापूरला सारिका भरणेंचा करिष्मा

इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात होती. भरत शहा राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर एकत्र येत मुकाबला उभा राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांमुळे प्रदीप गारटकर वरचढ ठरतील, असे चित्र होते. मात्र, ऐनवेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी प्रचाराची सर्व सूत्रे हाती घेतली. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न निर्णायक ठरला. त्यातूनच भरत शहा विजयी झाले आणि इंदापूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Local Body Election 2025: Ajit Pawar leads, Shinde faction gains.

Web Summary : NCP secured the most seats in Pune's local elections, followed by BJP. Shinde faction surprisingly gained significant ground. Internal conflicts within the Mahayuti alliance impacted results. NCP retains dominance despite BJP's efforts to weaken it.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2025Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना