शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘पिफ’मध्ये ‘पुणे’च उणे; पालिकेकडून निधी नाही, तरतूद नसल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:24 IST

पंधरा वर्षांपासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने शहराच्या सांस्कृतिक विश्वात एक मानबिंदू प्रस्थापित केला आहे. तरीही  ‘पिफ’मध्ये  ‘पुणे’ उणेच राहिले आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून महोत्सवाला देण्यात येणारा निधी प्रशासनाने केला बंदकिमान ३ लाख रक्कम तरी मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा : डॉ. जब्बार पटेल

पुणे : पंधरा वर्षांपासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने शहराच्या सांस्कृतिक विश्वात एक मानबिंदू प्रस्थापित केला आहे. तरीही  ‘पिफ’मध्ये  ‘पुणे’ उणेच राहिले आहे. शहरात एवढा मोठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणे ही अभिमानाची बाब असल्याने त्याच्या यशस्विततेसाठी महापालिकेने सर्वतोपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, महोत्सवापासून महापालिकेने लांबच राहणे पसंत केले असून, दोन वर्षांपासून महोत्सवाला देण्यात येणारा निधीही प्रशासनाने बंद केला आहे.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला २००२मध्ये सुरुवात झाली, त्या वेळचा खर्च होता ३० लाख रुपये. आज या महोत्सवाच्या आयोजनाचा खर्च हा २ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. २००४मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रभात फिल्म कंपनीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून १० लाख रुपयांचा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली होती. संयोजकांनी राज्याला पुन्हा विनंती करून अधिक हातभार लावण्याची विनंती केली असता जागतिक स्पर्धेसाठी पुरस्कार देण्याबाबत शासनाने पुढाकार घेतला. आज शासनाचा हा अधिकृत महोत्सव असून, शासनाकडून महोत्सवाला ५० लाख रुपये आणि २० लाख रुपये पुरस्कार रक्कम असे एकूण ७० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, चित्रपटांसह आयोजनाच्या इतर खर्चातही वाढ झाल्याने शासनाकडून अनुदानाच्या रकमेत वाढ व्हावी, अशी मागणी आयोजकांकडून केली जात आहे; परंतु शासनाकडून अद्यापही अनुदानवाढीला हिरवा कंदील मिळालेला नाही. ही कमी महापालिका प्रशासन दूर करू  शकते; मात्र महापालिकेने पिफकडेच पाठ फिरवली असल्याचे दिसते. 

सुरुवातीच्या काळात महोत्सवाला १० लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, शासनाने बंधन घातल्याने महोत्सवाला ३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देता येत नाही. ती द्यायची झाल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. महोत्सवाच्या आयोजकांनी मागणी केल्यास रक्कम देता येऊ शकेल.- सुरेश जगताप, सहआयुक्त 

बाहेरच्या शहरातील महोत्सवांना महापालिकेचे सहकार्य मिळते; मात्र पुणे, मुंबई त्याला अपवाद ठरले आहेत. महापालिकेकडून पिफला दोन वर्षांपासून कोणतेही आर्थिक सहकार्य मिळत नाही. शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ३ लाखांच्या वर रक्कम देता येणार नाही, अशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. मात्र, किमान ३ लाख रुपयांची रक्कम तरी मिळावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत, अनेक पत्रव्यवहार झाले आहेत.- डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष, पिफ

टॅग्स :PIFFपीफJabbar Patelजब्बार पटेल Puneपुणे