शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक पुन्हा लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 13:46 IST

शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार महाविकास आघाडी काढून घेणार

ठळक मुद्देअद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आवश्यक असलेले गण निश्चित  व गणांचे आरक्षण केले जाहीर बँकेच्या संचालकांचे सहकारमंत्र्यांना साकडे

पुणे : राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी आणि शेतीमाल उत्पादकांना मतदानाचा अधिकार दिला होता. परंतु, आता शिवसेनेसह राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला हा अधिकार काढून घेऊन पुन्हा विविध कार्यकारी सोसायट्याचे सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा वटहुकूम काढण्याच्या हालचाली शासनाच्या स्तरावर सुरू आहेत. सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती होऊ घातलेल्या निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आवश्यक असलेले गण निश्चित  व गणांचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानंतर प्रत्येक गणनिहाय मतदार निश्चित करून १२ फेबु्रवारी रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी बाजार समितीच्या निवडणूक कायद्यात बदल केला तर ही निवडणूक प्रक्रिया थांबणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरीशेतीमाल उत्पादकांना असणारा मताधिकार रद्द करून तो पुन्हा पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सदस्य मंडळांना मतदार म्हणून अधिकार देणारा वटहुकूम किंवा शासन निर्णय एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ही मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनीदेखील त्याला अनुकूलता दर्शवली आहे. हा बदल कसा करता येईल किंवा कसे, याबाबत तपासणी करण्याच्या सूचना सहकार आणि पणन विभागाच्या अधिकाºयांना दिल्या आहेत.......बँकेच्या संचालकांचे सहकारमंत्र्यांना साकडेज्या विविध कार्यकारी सोसायट्या थकबाकीत आहेत, त्या सोसायट्यांच्या मतदान प्रतिनिधीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदान प्रतिनिधी नियुक्त करता येत नसल्याने पुणे जिल्ह्यातील काही आमदार संचालकांसह संचालक अडचणीत आले आहेत.  ..........मतदान प्रतिनिधी म्हणून अपात्र ठरल्यास त्यांना मतदार आणि संचालकदेखील होता येणार नाही. म्हणून या प्रश्नांमधून तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी (दि.१४) सहकारमंत्र्यांची भेट घेऊन या नियमात काही पर्याय काढता येतो का, याची चाचपणी करण्यासाठी बँकेचे संचालक मुंबईला जाणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार