शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पुणे : दुसरी लाट ओसरताच 'जम्बो' कोविड सेंटर बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 23:43 IST

शेवटच्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू. मार्चपासून ३००० रुग्णांवर उपचार.

ठळक मुद्देशेवटच्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू.मार्चपासून ३००० रुग्णांवर उपचार.

पुणे : पुणेकरांसह अन्य जिल्ह्यातील नागरिकांना जम्बो कोविड रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या लाट ओसरू लागल्याने जम्बोमधील रुग्ण कमी झाले होते. त्यानंतर जम्बोमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेणे थंबविण्यात आले होते. शुक्रवारी जम्बो अखेर पुन्हा बंद करण्यात आल्याची  माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर १ जून रोजी रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आठवडाभराने आणखी १०० खाटा कमी करण्यात आल्या. केवळ २०० खाटा कार्यान्वित ठेवण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर २२ मार्चपासून जम्बो पुन्हा सुरू करण्यात आले.

दुसऱ्या लाटेत जम्बो पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर त्याची क्षमता ७०० रुग्णांवर नेण्यात आली होती. दुसऱ्या लाटेमध्येही ३००९ रुग्णांना या रुग्णालयाचा मोठा फायदा झाला. मागील दीड महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली गेली आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेटही पाच टक्क्यांच्या खाली आला होता. रुग्णसंख्या घटत गेल्याने ऑक्सिजनवरील रूग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची मागणी कमी झाली आहे.

जम्बोमध्ये नवीन रुग्णांचे प्रवेश बंद करण्यात आल्यानंतर तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ५० बेडचे आयसीयू आणि एचडीयू विभाग सुरू ठेवण्यात आला होता. हे रुग्ण अन्यत्र हलविण्यात आले नव्हते. त्यामुळे शेवटच्या रुग्णापर्यंत येथील यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली होती. जम्बोमध्ये शेवटचा एकच रुग्ण होता. सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असलेल्या या शेवटच्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत जम्बोमध्ये झालेल्या उपचारांची आकडेवारी२२ मार्च ते १ जुलैएकूण दाखल रुग्ण - ३००९बरे झालेले रुग्ण - १९०९स्वेच्छेने अन्य रुग्णालयात गेलेले - ४४६मृत्यू - ६५४'जम्बो'चे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटजम्बो कोविड सेंटरने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुणेकरांसह परजिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोरोना काळात जम्बोच्या माध्यमातून मोठी वैद्यकीय यंत्रणा लोकांच्या सेवेत कार्यान्वित झाली होती. जम्बो आता पुन्हा तात्पुरते बंद करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार ते पुन्हा उघडले जाईल. दरम्यान, आयआयटी दिल्लीकडून पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.- रुबल अगरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.)

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस