शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: जमिनीच्या वादातून  जेजुरीचे माजी नगरसेवकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 10:36 IST

Pune: धालेवाडी गावाच्या हद्दीत नाझरे धरणाच्या शेजारील शेतात जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूबभाई सय्यदलाल पानसरे वय ४८ यांच्या सह तिघांवर पाच जणांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार केले. यात माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जेजुरी -  धालेवाडी गावाच्या हद्दीत नाझरे धरणाच्या शेजारील शेतात जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूबभाई सय्यदलाल पानसरे वय ४८ यांच्या सह तिघांवर पाच जणांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार केले. यात माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि ७ रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.   जेजुरी पोलिसांनी कुऱ्हाड व कोयत्याने मारहान करणाऱ्या  वनेश प्रल्हाद परदेशी,किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी  रा. बेंद वस्ती जेजुरी, व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची  नाझरे धरण परिसरात शेती आहे .या शेतात ट्रकटर द्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे व त्यांचे बरोबर इतर तिघेजण हे शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून भांडण झाले. यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले,इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे व इतर दोघांवर कुऱ्हाड व कोयत्याने वार केले .यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून मेह्बून पानसरे मानेवर खोलवर वार झाल्याने त्याच्यावर जेजुरीतील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.    विभागीय पोलीस अधिकारी तानाजी भरडे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे