शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 17:38 IST

टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत असा आरोप शिंदेसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला.

पुणे - शहरातील जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणावरून महायुतीत वादाचे खटके उडाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या जमीन घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्यात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उडी घेत मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या जमीन घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्याशिवाय मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मुरलीधर मोहोळ यांचा या प्रकरणात खुलासा पाहिला त्यात ते किती हतबल झालेत हे दिसून येते. महाराष्ट्रातील कुठे काय रेट आहेत हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. मुरलीधर मोहोळ ज्याप्रकारे विषय मांडतात, भाजपा म्हणून मी बोलत नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. १९५८ मध्ये जैन बोर्डिंगने जमीन खरेदी केली होती. गोरगरिबांची मुले तिथे शिकली पाहिजेत त्यासाठी वसतिगृह बनवण्यात आले होते. मात्र काही ट्रस्टींना हाताशी धरून जमिनीचा जो व्यवहार झाला तो संशयास्पद आहे. निवडणुकीपासून ही जमीन हडपण्याचा प्लॅन सुरू होता. २१ नोव्हेंबर २०२३ ला श्रीराम जोशींनी चॅनलला मुलाखत दिली होती. या जागेचे २३० कोटी मिळू शकतात हे सांगितले. टेंडर काढण्याआधीच १५ टप्प्यात पैसे मिळणार हे सांगितले होते. विशाल गोखले आणि इतरांसोबत मुरलीधर मोहोळ महावीर जयंतीला तिथे कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथल्या जमिनीवर त्यांचा डोळा पडला. १३ डिसेंबर २०२४ ला सर्व संचालकांची बैठक झाली. त्यानंतर तीन दिवसांनी ही जमीन विकायची हा ठराव झाला. मात्र त्याआधीपासून जमिनीचा व्यवहार करायचा हे ठरले होते असं त्यांनी सांगितले.

तसेच १६ डिसेंबरच्या ठरावानंतर जमिनीबाबत टेंडर प्रक्रिया सुरू झाली. त्यात ३ ठेकेदार आले. त्यात लांजेकर, बडेकर आणि तिसरे गोखले आले. तिघांचे अर्ज एकाच ठिकाणी टाईप करण्यात आले. त्यात संबंधित जमिनीची एक किंमत ठरवण्यात आली होती. मात्र लांजेकर, बडेकर या कंपन्यांनी त्या रक्कमेच्या खालची किंमत अर्जात दिली. ही सर्व मिलिभगत होती. या जमिनीसाठी लिलाव किंमत लांजेकर १८० कोटी, बडेकरांनी २०० कोटी तर गोखले यांनी २३० कोटी अशी रक्कम भरली होती. टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत. मोहोळ केविळवाणा प्रयत्न करत आहेत. जैन मंदिरावर दरोडा टाकण्याचं काम मोहोळ यांनी केले. जे विद्येचे माहेर घर आहे ते लुटारूंचं माहेर घर झालं असा घणाघात रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर केला. 

दरम्यान, पुण्याचे खासदार कलमाडी यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांच्या पक्षाने राजीनामा घेतला. कालांतराने न्यायिक प्रक्रियेत ते सुटले पण त्या काळात कलमाडींवर कारवाई करण्याचे धाडस काँग्रेस पक्षाने केले. भाजपानेही या प्रकरणात ईडीची चौकशी करून ट्रस्टी आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून या प्रकरणात ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. जे या प्रकरणात दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला सामोरे गेले पाहिजे अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahayuti Conflict: Shinde Sena demands Mohol's resignation over land dispute.

Web Summary : Shinde Sena demands minister Mohol's resignation amid land scam allegations. Dhangekar alleges corruption in Jain boarding land deal, seeks Modi's intervention, and calls for investigation.
टॅग्स :ravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना