शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 20:04 IST

Israel Palestine war : मागील दोन आठवड्यापासून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरातही उमटले आहेत.

- किरण शिंदेपुणे - मागील दोन आठवड्यापासून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरातही उमटले आहेत. या दोन्ही देशांच्या युद्धाच्या पार्श्भूमीवर पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हा प्रकार हाणून पाडला. या प्रकरणी पुणे शहरातील कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इस्त्राईल देशाच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर रस्त्यांवर पायदळी येतील या उद्देशाने चिटकवल्याचे समोर आले आहे. मात्र, पुणे पोलिसांनी काही वेळातच हा प्रकार उघड करत अशाप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल ४ गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पुण्यातील लष्कर, समर्थ तसेच खडक व कोंढवा पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ६ आरोपी निष्पन्न अशाप्रकारे केले आहेत.

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इस्रायलने हमास संघटनेच्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. याचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. याच मुद्यावरून पुणे शहरातही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी कोंढवा, लष्कर, खडक व समर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही जणांकडून रस्त्यांच्यामधोमध इस्त्राईल देशाच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर चिटकवण्यात आले होते.मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हे स्टिकर काढले आणि सबंधितावर गुन्हे दाखल केले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी