शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Pune International Airport: पुण्यातून ‘एअर बबल’अंतर्गत शारजाला उडणार विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:46 IST

पुणे-दुबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावल्याने या सेवेस आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

प्रसाद कानडेपुणे : पुणे-शारजा दरम्यान ‘एअर बबल’अंतर्गत विमानसेवा सुरू होत आहे. आखातातील शारजासाठी लवकरच ‘स्लॉट’देखील उपलब्ध केला जात आहे. पुण्याहून पहिल्यांदाच एअर बबल करारांतर्गत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे गेले जवळपास पावणेदोन वर्षे पुण्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डोमेस्टिक’चे रूप प्राप्त झाले आहे. ‘एअर बबल’मुळे यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे-दुबई विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावल्याने या सेवेस आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र तत्पूर्वी ‘एअर बबल’अंतर्गत पुण्याहून आंतरराष्ट्रीय सेवेचे जोरदार प्रयत्न झाले. पुण्यातील कोरोना संसर्गाचा दरही लक्षणीयरीत्या कमी झाल्याने दुबई सरकारनेही यास अनुकूलता दर्शवली. त्यामुळे डिसेंबर अखेर पुणे-शारजा विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

पुणे-दुबईची तयारी पूर्ण

पुणे विमानतळावरून दुबईसाठी हवाई सेवा सुरू होणे जवळपास निश्चित झाले होते. दुबईसाठी ‘स्पाईस जेट’ला स्लॉटदेखील उपलब्ध झाला होता. पुण्याहून दररोज सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी दुबईच्या दिशेने विमान झेपावणार होते. मात्र त्याआधीच ओमायक्रॉनचे संकट आल्याने भारत सरकारने तत्काळ ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध लावले. त्याचा फटका पुणे-दुबई नियोजित सेवेला बसला.

‘एअर बबल’ करार म्हणजे काय?

कोरोना कालावधीत ज्यावेळी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी आणली त्यावेळी भारतासह काही देशांनी ‘एअर बबल’ करार केला. कोरोना महामारीच्या काळातही विमानसेवा चालू ठेवण्यास आपली हरकत नसल्याचे दोन्ही देश काही अटींसह मान्य करतात. त्यास ‘एअर बबल’ करार म्हटले जाते.

पुणे-शारजा विमानसेवेसाठी एअर बबल करार केला जात आहे. त्याअंतर्गत लवकरच पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. येत्या काही दिवसात तारीख निश्चित केली जाईल.

- संतोष डोके, विमानतळ संचालक, लोहगाव (पुणे) विमानतळ

पुण्याहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. बबल कराराअंतर्गत विमानसेवा सुरू होत असेल तर ती चांगलीच बाब आहे. याच

कराराअंतर्गत दुबईसाठीदेखील विमानसेवा सुरू व्हावी.

- धैयशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळMaharashtraमहाराष्ट्र