पुणे : महानगरपालिकेपुढे ‘पॅडमॅन’चा आदर्श, शहरात ३५ ठिकाणी डिस्पोजल यंत्रे बसवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:24 IST2018-03-01T07:24:23+5:302018-03-01T07:24:23+5:30
पॅडमॅनपासून स्फूर्ती घेत महापालिकेने शहरातील शाळा, महाविद्यालयीन मुली तसेच महिलांसाठी त्यांची सर्वात मोठी समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : महानगरपालिकेपुढे ‘पॅडमॅन’चा आदर्श, शहरात ३५ ठिकाणी डिस्पोजल यंत्रे बसवणार
पुणे : पॅडमॅनपासून स्फूर्ती घेत महापालिकेने शहरातील शाळा, महाविद्यालयीन मुली तसेच महिलांसाठी त्यांची सर्वात मोठी समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात एकूण ३५ ठिकाणी महापालिका सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल यंत्र बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या १३ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत मंजूरी देण्यात आली.
आधुनिक तंत्राद्वारे यावर उपाय शोधण्यात आला आहे. त्यातूनच डिस्पोजल यंत्राचा शोध लागला. सर्व आधुनिक शहरांमध्ये अशा प्रकारची यंत्रे बसवण्यात आली असून त्यामुळे त्यांच्याकडे आता ही समस्या शिल्लक राहिलेली नाही. शहरात सध्या ३५ ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत. स्थायी समितीने त्यासाठी १३ कोटी ६९ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून दिले आहेत. मुली व महिलांना याची माहिती देणे, या प्रकारच्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीचे कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे, स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करणे हेही पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
-शहरातील कचºयातील खराब सॅनिटरी नॅपकिनचे प्रमाण साधारण २० टन इतके आहे. यात लहान मुलांच्या डायपरचाही समावेश आहे.
-वापर झाल्यानंतर कचरा म्हणून या वस्तू थेट कचºयातच जमा केल्या जातात. त्यामुळे कचरा वेचकांना त्रास तर होतोच शिवाय परिसरात जंतूंचा प्रादुर्भाव होऊन सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होता. त्यामुळे हा कचरा नष्ट करणे, ही मोठी समस्या होती. त्यासाठी महिलांना आता महापालिकेची मदत होणार आहे.