पुणे: राजगुरुनगर येथील आयडीबीआय बँक आगीच्या भस्मसात; शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 12:04 IST2023-03-28T12:04:03+5:302023-03-28T12:04:10+5:30

सुदैवाने यामध्ये कुठली जीवित हानी झाली नाही.

Pune: IDBI Bank in Rajgurunagar gutted by fire; The fire is believed to have started due to short circuit | पुणे: राजगुरुनगर येथील आयडीबीआय बँक आगीच्या भस्मसात; शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज

पुणे: राजगुरुनगर येथील आयडीबीआय बँक आगीच्या भस्मसात; शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज

राजेंद्र मांजरे

राजगुरूनगर: शहरातील पाबळरोड येथील आयडीबीआय बँकेला आग लागून बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळुन खाक झाल्याची घटना (दि. २८ )रोजी पहाटे घडली आहे. सुदैवाने यामध्ये कुठली जीवित हानी झाली नाही.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजगुरुनगर येथील पाबळ रोड येथे गावडे हॉस्पिटल शेजारी आयडीबीआय बँकेची शाखा आहे. पहाटे  तीन वाजण्याच्या सुमारास बँकेला भीषण आग लागली .या आगीत कागदपत्रे, फर्निचर, संगणक, प्रिंटर व इतर साहित्य जळून खाक झाले.  घटनास्थळी तात्काळ अग्निशामक बंब आल्याने मोठी दुर्घटना टळली.  

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अर्धा तासात आग आटोक्यात आणली. या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा तपशिल समजू शकलेला नाही.ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Pune: IDBI Bank in Rajgurunagar gutted by fire; The fire is believed to have started due to short circuit