पुणे: पुण्यातील येरवडा परिसरातील शादलबाबा दरग्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये शिरली. सुदैवाने, पहाटेची वेळ असल्याने आणि दुकाने बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी अत्यंत वेगाने शादलबाबा दरग्याकडून जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने जोरात दुभाजकाला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या दिशेने फेकली गेली. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, एका दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे.
CCTV मध्ये अपघाताचा थरार कैद
या अपघाताचे संपूर्ण दृश्य जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ज्यामध्ये कारचा वेग आणि धडकेची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे. ही दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा आरोप या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहनचालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. "दारू पिऊन बेजबाबदारपणे गाडी चालवल्याबद्दल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Summary : A speeding car crashed into shops near Yerwada's Shadal Baba Dargah in Pune. The driver, found intoxicated, lost control. Fortunately, no casualties occurred as shops were closed. Police arrested the driver.
Web Summary : पुणे के येरवदा में शादल बाबा दरगाह के पास एक तेज रफ्तार कार दुकानों में घुस गई। नशे में पाए गए ड्राइवर ने नियंत्रण खो दिया। सौभाग्य से, दुकानें बंद होने के कारण कोई हताहत नहीं हुआ। पुलिस ने ड्राइवर को गिरफ्तार कर लिया।