शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:30 IST

Pune Helicopter Accident : पुणे हेलिकॉप्टर अपघातात बुधवारी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune Helicopter Crash : पुण्यात बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेनं खळबळ उडाली. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच पुण्याच्या बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. महिन्याभरापूर्वी मुळशीमध्येही अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. मात्र यावेळी तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. आता या अपघातात मृत पावलेल्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या बावधनमध्ये बुधवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला.  पु्ण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने जाण्यासाठी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या आणि त्याचा अपघात झाला. उड्डाणानंतर हेलिकॉप्टर बराच वेळ आकाशात घिरट्या घेत होतं. शेवटी हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं आणि त्याने पेट घेतला. हेलिकॉप्टर अपघातात भारतीय वायुसेनेचे  दोन माजी वैमानिक आणि एक निवृत्त नौदल अभियंत्याचा मृत्यू झाला. तिघेही अनुभवी विमान व्यावसायिक होते. हेरिटेज एव्हिएशन या खाजगी दिल्ली स्थित विमान कंपनीच्या मालकीचे ऑगस्टा १०९ हेलिकॉप्टरने ते प्रवास करत होते.

या अपघातात गिरीशकुमार पिल्लई, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत या तिघांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरचे वैमानिक परमजीत सिंग (६२) आणि सहवैमानिक जी.के. पिल्लई (५७) हे होते. दोघेही भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी होते. तर अभियंता प्रीतम कुमार भारद्वाज (५३) हे माजी भारतीय नौदलाचे अधिकारी होते. तीन अत्यंत कुशल वैमानिकांच्या मृत्यूनंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे पुरावे गोळा करण्यासाठी विमान अपघात तपास ब्युरोचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

सुनील तटकरे करणार होते प्रवास

या हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रवास करणार होते. सुनील तटकरे हे मंगळवारी हेलिकॉप्टरने पुण्यावरून बीडमधील परळीला गेले होते. त्यानंतर ते मुंबईला परतले. त्यानंतर ते बुधवारी मुंबईवरून पुण्याला जाणार होते. त्यांना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होतं. मात्र काही वेळातच त्याचा अपघात झाला. या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. मी आज त्या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होतो, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाindian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात