शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किलोमीटर पर्यंत लांब रांगेमुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 19:49 IST

साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

हनुमंत देवकर/चाकण : साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतुकीत अडकून पडल्याने वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले होते. कधी एकदाचा उड्डाण पूल होतोय? असे वैतागून बोलले जात होते.सोमवारच्या नाताळाला जोडून शनिवार रविवारच्या लागोपाठ तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामगार वर्गाने गावाकडे जाणे व पर्यटनाला जाण्यासाठी घराबाहेर पडले. पुणे-नाशिक महामार्गावरून ओझर, लेण्याद्री, भीमाशंकर, शिवनेरी, शिर्डी, नासिक कडे जाणाऱ्या तसेच नासिक बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची महामार्गावर अचानक संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. वाहतूक संथ गतीने जात असल्याने प्रवासी वैतागले होते. आंबेठाण चौक ते तळेगाव चौकापर्यंत अक्षरश: सर्व्हिस रस्त्यावरही रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बसेस प्रवाशांनी जनावरांसारख्या कोंबून भरल्या होत्या.महामार्गावरील राजगुरूनगर, चांडोली टोलनाका, चाकण मधील आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा, एम आय डी सी चौक, कुरुळी फाटा, मोई फाटा, चिंबळी फाटा सह मोशी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सातत्याने पुणे-नासिक महामार्ग रुंदीकरणाचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

टॅग्स :Travelप्रवासPuneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस