पुणे : गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, ‘जय श्री राम’च्या घोषणा आणि ढाेल-ताशांच्या गजरात शनिवारी सकाळी ९:३० वाजता मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. सर्वात समोर तुतारी... मग नगारा वादन, त्यावर उभा बालशिवाजी... ‘मोरया मोरया’चा जयघोष... रमणबाग ढोल-ताशा पथक... झेंडेवाले... टाळ वादन... ढोल वादन... डोक्यावर फेटा आणि अंगात लाल रंगाचा सदरा... हवेत झेंडे उडवत गणपती बाप्पाचा जयघोष करीत होते. त्यानंतर, चारही मानाचे गणराय मार्गस्थ झाले आणि सुमारे ८ तास १० मिनिटांत मानाच्या गणरायांना निरोप देण्यात आला.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसमोर परशुराम वाद्य पथक अर्धा तास प्रात्यक्षिक केले, कामायनी पथकाने दिला झाले लावा, झाडे जगवाचा संदेश... बँक ऑफ इंडियाची टीमही झाली सहभागी. श्री जयंती गजानन रथ जिजाऊ शिवबा यांचा देखावा आणि पोवाडा सादर केला. दादोजी कोंडदेव सोन्याचा नांगर असे सर्व होते. त्यानंतर, आला रुद्रगर्जना पथक. प्रभात बँड पथकाने वाद्याची सलामी दिली... जय जय महाराष्ट्र माझा, गाणे सादर करून दाद मिळवली. टिळक चाैकात नियाेजित वेळेच्या पंधरा मिनिटे आधी पाेहाेचला. बराेबर ३ वाजून ४५ मिनिटांनी विसर्जित झाला.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचा राजाही शाही थाटात मार्गस्थ झाला. डोक्यावर गांधी टोपी आणि अंगात पिवळा कुर्ता घालून ताल पथकाने लक्षवेधी प्रात्यक्षिक सादर केले. वराह अवताराचा जिवंत देखावा सादर केला. त्याच्या पाठाेपाठ विघ्नहर्ता पथकाने प्रात्यक्षिक सादर केले. हत्तीवर विराजमान शिवरायांचा भव्य देखावा भाविकांनी माेबाइलमध्ये कैद केला. शिवमुद्रा पथकाने प्रात्यक्षिक सादर केले. तांबडी जोगेश्वरी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली हाेती. ४ वाजून ५ मिनिटांनी विसर्जित झाला.
शिवमुद्रा पथकाचे तालबद्द सादरीकरण झाले. डोक्यावर पांढरा फेटा आणि अंगात भगवा कुर्ता घालून महिला मंडळाने सादरीकरण केले. मानाचा तिसरा गुरुजी तालीम पथक दाखल. पुण्याचा राजा गर्जना पथकाने सादर केले प्रात्यक्षिक. अश्वराज बँड पथकाने गुलालाची उधळण केली. आया रे राजा गाण्यावर भाविकांनी धरला ठेका. जय श्री राम... जानकी गायनच्या घाेषणा दिल्या. पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाला पुढे आणले. नादब्रह्म पथकाने प्रात्यक्षिक सादर करून गुलालाची उधळण केली. मंडळाचा गणपती ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जित झाला.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळही जल्लाेषात मार्गस्थ झाला. सर्वात पुढे नगारा वादन सुरू हाेते. त्यानंतर, स्व-रूपवर्धिनी पथकाने प्रात्यक्षिक सादर केले. हलगीच्या तालावर अफजल खान वधाचा, ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला, तसेच मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया...चा जयघोष करण्यात आला. कृष्ण अवतार सादर केले. त्यानंतर, गजलक्ष्मी पथकाचे वादन झाले. शिवमुद्रा पथकानेही वादन केले. फुलांनी सजवलेल्या मयूर रथात बाप्पा टिळक चौकात ३:३२ वाजता दाखल झाला. रथावर राधा कृष्ण पाळण्यात विराजमान होते. या बाप्पाचे बराेबर ५ वाजून ७ मिनिटांनी विसर्जन झाले.
मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती समोर बिडवे बंधू यांचा नगारा, त्यानंतर पारंपरिक मर्दानी खेळाचे सादरीकरण आणि लोकमान्य टिळक यांचा जिवंत देखावा अशी भव्य मिरवणूक निघाली. स्वराज्य पथकाने प्रात्यक्षिक सादर केले.
शिवमुद्रा पथक, श्रीराम पथकाने जल्लोषात सादरीकरण केले. भगवे फेटे आणि पिवळा कुर्ता घालून श्रीराम पथकाने केसरी वाडा गणपतीसमोर सादरीकरण केले. बराेबर ५ वाजून ४० मिनिटांनी पांचाळेश्वर घाट येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.