शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganpati Festival : 'गणपती बाप्पा मोरया...'चा जयघोष अन् ढोलताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:47 IST

- ढोलताशांचा गजर, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी अन आकर्षक रथामधून काढलेल्या मिरवणुकांमधून शहरात संचारले चैतन्य

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया" चा जयघोष, ढोल ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी, मंडपांमध्ये काढलेली आकर्षक रंगावली.. अशा दिमाखात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून बुधवारी मानाच्या गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या ' श्रीं' ची प्रतिष्ठापना करण्यात आली. वरुणराजाचा अधूनमधून होणारा शिडकावा, सर्वत्र आंनद व उत्साहाची झालेली उधळण.. विघ्नहर्त्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि गणरायाला तोरण अर्पण करण्यासाठी गणेशभक्तांची लागलेली रांग या माध्यमातून अवघी पुण्यनगरी " गणेशमय' झाली होती. बाप्पाच्या जयघोषात घरोघरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले.

चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची मूर्ती फुलांनी सजलेल्या आणि विद्युत रोषणाई नटलेल्या आकर्षक मंडपात विराजमान झाली. त्यापूर्वी विविध गणेश मंडळांनी गणरायाची आगमन मिरवणूक काढली. सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आल्याने भाविकांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याची प्रचिती बुधवारी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मिरवणुकांमधून आली. मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाजतगाजत गणरायाचे स्वागत केले. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असला तरी त्यानंतरही मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर आणि उपनगरांमध्येही गणरायाच्या आगमन मिरवणुका रात्रीपर्यंत सुरू होत्या. " गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाला. सकाळपासूनच महिलांची बाप्पाच्या स्वागतासाठी सडा रांगोळीसह नैवेद्यासाठी लगबग सुरु होती. बाप्पाला उकडीच्या मोदकांसह विविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य ठेवण्यात आला.

कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक उत्सव मंडपातून पारंपरिक चांदीच्या पालखीतून सुरू झाली. संघर्ष, अभेद्य आणि श्रीराम ढोल-ताशा पथकांचा सहभाग असलेली मिरवणूक अभिजित धोंडफळे यांच्याकडून उत्सव मूर्ती घेतल्यानंतर रास्ता पेठ, रवींद्र नाईक चौक, दारुवाला पूल आणि फडके हौदमार्गे उत्सव मंडपामध्ये आली. स्वामी सवितानंद यांच्या सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

तांबडी जोगेश्वरी

केळकर रस्त्यावरील मूर्तिकार गुळुंजकर यांच्याकडून उत्सव मूर्ती घेतल्यानंतर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सुरू झाली. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ग्रास बॅण्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक यांचा सहभाग असलेली ही मिरवणूक कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, आप्पा बळवंत चौकमार्गे उत्सव मंडपात पोहोचली. सनई-चौघड्याच्या निनादामध्ये चांदीच्या पालखीत वासुदेव आश्रम निवासाचे प्रधान विश्वस्त शरद जोशी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना झाली.

गुरुजी तालीम

स्वप्नील सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी साकारलेल्या पुष्परथातून गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता गणेश मंदिरापासून सुरू झाली. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, राघमंत्र ढोल ताशा पथक, विघ्नहर्ता ढोल ताशा पथकांचा सहभाग असलेली ही मिरवणूक गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकमार्गे उत्सव मंडपात आली. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/769874446031879/}}}}

तुळशीबाग मंडळ

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करत असलेल्या मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची फुलांचा वर्षाव करीत ढोल-ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते दुपारी सव्वाबारा वाजता करण्यात आली. गणरायाच्या आगमन सोहळ्याचा शुभारंभ उद्योजक पुनीत बालन व उत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाला. मिरवणुकीत लोणकर बंधूचे नगारावादन रुद्रांग व तालगर्जना वाद्यपथक सहभागी झाले होते.

केसरीवाडा गणेशोत्सव

केसरीवाडा गणेशोत्सवाची मिरवणूक रमणबाग चौकातून सकाळी नऊ वाजता सुरू झाली. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडा वादन अग्रभागी असलेल्या मिरवणुकीमध्ये परंपरेनुसार मानाच्या पालखीत गणराय विराजमान होते. रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकांचे केसरीवाड्यात स्थिर वादन झाले.  

अखिल मंडई मंडळअखिल मंडई मंडळ फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू झाली. युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अध्यक्ष नवीनचंद्र मेनकर आणि स्नेहल मेनकर यांच्या हस्ते शारदा गजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी समाज मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक मंडई पोलीस चौकी, हुतात्मा बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक येथून उत्सव मंडपात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक तसेच मल्हार ढोल ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेल्या श्रीमंत दगडूशेठ हललाई गणपतीची प्रतिष्ठापना मध्यप्रदेश चित्रकूट स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात आली. आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधूंचे सनईवादन, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1727072884476511/}}}}

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहंब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची दुपारी सव्वाबारा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. लाठीकाठी मर्दानी खेळ, केशव पथकाचा शंखनाद, श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर आणि नूमवि ही सात ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. रथाला बैलजोडी न लावता ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा रथ ओढला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव