शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganpati Festival : शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांचे जिओ मॅपिंग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 11:00 IST

गणेशोत्सव राज्यासह देश-विदेशातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त येतात.

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांसह उपनगरातील महत्त्वाच्या मंडळांचे जिओ मॅपिंग करण्यात आले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना मंडळांची माहिती आणि ठावठिकाणा त्वरित उपलब्ध होऊन सुरक्षेसंदर्भात तत्काळ प्रतिसाद व मदत करणे शक्य होणार आहे.

गणेशोत्सव राज्यासह देश-विदेशातील गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त येतात. शहरातील मध्यवर्ती भागातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरी वाडा या मानाच्या पाच गणपतींसह अखिल मंडई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू, गेणू या गणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्याचबरोबर उपनगरातील नामांकित मंडळेही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी यंदा सर्व महत्त्वाच्या मंडळांना जिओ मॅपिंगच्या माध्यमातून सुरक्षा कवच दिले आहे.

पोलिसांना 'डिजिटल हजेरी'पोलिसांना दररोजची 'डिजिटल हजेरी' अनिवार्य झाली आहे. म्हणजे पोलिसांनी प्रत्यक्ष मंडळाला भेट दिली की त्याची नोंद ऑनलाइन प्रणालीमध्ये होणार आहे. यामुळे जबाबदारी अधिक पारदर्शक राहील, तसेच मंडळांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांची गर्दी, मिरवणुका तसेच रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम लक्षात घेता पोलिसांनी घेतलेली ही तांत्रिक मदत मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरू शकते. 

महिलांची सुरक्षागणेशोत्सवात १० व्या दिवसापर्यंत दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. या काळात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी करण्यात आले आहे. जिथे जास्त गर्दी, तिथे जास्त बंदोबस्त तर कमी गर्दी असलेल्या ठिकाणीही बंदोबस्त नेमलेला प्रत्येक मंडळ व चौकनिहाय नियोजन आहे. या शिवाय महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही योजना आखण्यात आल्या आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव