पुणे : शहरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उत्सव काळात पोलिसांचे वॉच टॉवर अहोरात्र कार्यरत आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी हा पहारा अधिकच कडक असणार आहे. विसर्जन मार्गावर तब्बल २० ठिकाणी पोलिसांनी वॉच टॉवर उभारले आहेत. यासह ५ मोबाइल सर्वेलन्स व्हेइकलद्वारे देखील गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
या ठिकाणी उभारण्यात आले आहेत वॉच टॉवर...
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत...
- सोन्या मारुती चौक
- सुयोग डेअरी गुरुदत्त मेडिकलसमोर
- कसबा चौक
- बेलबाग चौक
---
विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत..
- मंडई पोलिस चौकी
- गणपती चौक माने दुकानासमोर
- अगत्य हॉटेल तुळशीबाग लेन
- सेवा सदन चौक अप्सरा दुकानाजवळ
- रुपसी साडी दुकानासमोर शनिपार
- शनिपार चौक
- फुटका बुरूज चौक मल्हार चायनिज दुकानासमोर
- अप्पा बळवंत चौक
- जिजामाता चौक
- बुधवार चौक
- म्हसोबा मंदिर, तुळशीबाग लेन कॉर्नर (बाबू गेणू गणपती मंडळासमोर)
- नाना चावडी चौक (समर्थ पोलिस ठाणे)
- भोपळे चौक (लष्कर पोलिस ठाणे)
- खडकी (खडकी बाजार)
- गोटीराम भैया चौक (खडक पोलिस ठाणे)
जवळच्या पोलिस ठाण्याचे फोन नंबर असे..
फरासखाना पोलिस ठाणे - ०२०- २४४५२२५०
विश्रामबाग पोलिस ठाणे - ०२० - २४४५७७५०
डेक्कन पोलिस ठाणे - ०२० - २५६७५००५
समर्थ पोलिस ठाणे - ०२० - २६०६५४९१
खडक पोलिस ठाणे - ०२० - २४४७६४२२
स्वारगेट पोलिस ठाणे - ०२० - २४४८८६३३
लष्कर पोलिस ठाणे - ०२० - २६२०८२२८
शिवाजीनगर पोलिस ठाणे - ०२० - २५५३६२६३
पोलिस हेल्पलाइन नंबर - ११२
अग्निशमन दल - १०१
वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था...
पुणे शहर पोलिसांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर चार ठिकाणी वैद्यकीय मदत पथके व रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. त्यांचे नियोजन, समन्वय व नियंत्रणाची जबाबदारी विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई (९८२२०९७५५५), डॉ. शंतनू जगदाळे (९०११९१६६०७), डॉ. नितीन बोरा (१८२२९६९६६१), डॉ. नंदकुमार बोरसे (९४२२०३२६९६) आणि सदाशिव कुंदेन (९९२१५७४४९९) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
१) बेलबाग चौकात असतील दोन रुग्णवाहिका :
अ) माय माउली रुग्णवाहिका - चालक - देवकुळे (९७३०४०५१८९)
ब) ओम रुग्णवाहिका - चालक - दीपक माने - (८८०६७४२४७१)
२) केळकर रस्ता :
नारायण पेठ पोलिस चौकीजवळ - चाराचंद हॉस्पिटल रुग्णवाहिका - चालक - तुषार बागल (७३८५०००७३६)
३) एस. पी. कॉलेज चौक :
रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांची रुग्णवाहिका - चालक - विशाल शेवरेकर (७४९८९२७१८५)
४) अप्पा बळवंत चौक :
मदरहुड हॉस्पिटल यांची कार्डियाक रुग्णवाहिका - चालक - शिरसाट (७३८७९६९०९१)