शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ही' मूर्ती आहे, चक्क चंदनाच्या लाकडाची;‘कडबेआळी तालीम’ची गणेशमूर्ती ठरली चर्चा रंगवणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:38 IST

भाविक धातूचा गणपती, मातीचा गणपती, लाकडाचा गणपती, पीओपीचा गणपती, फायबरचा गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेला गणपती यातील विविधता टिपत आहेत.

पुणे : गणेशाेत्सव आणि पुणे एक अतूट नाते असून, त्याची भुरळ जगभरातील भाविकांना पडलेली आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी हाेत आहे. यात भाविकांना लाडक्या गणरायाचे विविध रूपे पाहत आहेत. त्याचबराेबर भाविक धातूचा गणपती, मातीचा गणपती, लाकडाचा गणपती, पीओपीचा गणपती, फायबरचा गणपती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेला गणपती यातील विविधता टिपत आहेत.शनिवार वाडा परिसरातील १९३४ साली स्थापन झालेल्या कडबेआळी तालीम मंडळाची गणेशमूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याचे कारण, ही मूर्ती चंदनाच्या लाकडापासून साकारली असून, तिचा तेज आजही कायम आहे. ‘पीओपी’च्या जगात लाकडी मूर्ती दुर्मिळ झाल्याने सर्वांचे लक्ष या मूर्तीकडे वेधले जात आहे.

पेशवेकालीन चंदनाच्या लाकडाची गणेश मूर्ती, समाेरच छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि पुरंदर किल्ला असे येथील दृश्य. तत्पूर्वीच भव्य प्रवेशद्वार आहे आणि आत येताच स्वामी समर्थ डाेळ्यासमाेर पडतात. स्वामींचे दर्शन घेऊन पायऱ्या चढून आले की गणराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन भाविक किल्ले पुरंदरचा देखावा पाहत इतिहासात रमून जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमित गोविंदराव पळसकर यांनी दिली.

ट्रस्टी गणेश किसनराव पळसकर आणि मंडळाचे कार्यकर्ते भाविकांची काळजी घेत हाेते. पळसकर यांची ही सहावी पिढी मंडळाचे काम पाहत असून, विविध धार्मिक, सामाजिक कामातही त्यांचा सहभाग असताे, असे ट्रस्टींनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड