पुणे : कोकणातील गणपती प्रसिद्ध उत्सव आहे. त्यामुळे लाखो कोकणवासीय कोकणात येतात. यामुळे राज्यातील अनेक एसटी विभागातील लालपरी कोकणात पाठविल्या जातात. यंदा पुणे विभागातील २३० एसटी कोकणवासीयांना पोहोचविण्यासाठी कोकणात पाठविण्यात आल्या. दरम्यान, ट्रॅव्हल्सवाल्यांकडून तिकीट दरवाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात कामानिमित्त स्थायिक असलेल्या कोकणवासीय एकत्रित येऊन ग्रुपद्वारे गावी जातात. कोकणात जाणाऱ्या भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी आजही एसटीला पसंती देतात.
एक महिन्यापूर्वीच बसचे ग्रुप बुकिंग करण्यात येते. पुणे विभागातून स्वारगेट आणि पिंपरी आगारातून लालपरी काेकणात सोडली जाते. यंदा मागील वर्षापेक्षा भाविकांकडून जादा बस बुक करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोकणातील या ठिकाणी आहेत ग्रुप बस
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, गुहागर, सावर्डे, खेड, माणगाव, दापोली, देवरुख, सावंतवाडी, देवगड, लांजा, साखरपा व इतर ठिकाणी जाणाऱ्या भाविकांनी १४१ एसटी ग्रुपद्वारे बुक केल्या आहेत. यामध्ये ४२ प्रवाशांचा ग्रुप असतो.
जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत
कोकणात दोनशे एसटी गाड्या पाठविल्या तरी एसटी प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व मार्गावर नियोजन करून बस सोडण्यात येत आहेत. शिवाय या बस एका दिवसांसाठी कोकणात पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.ट्रॅव्हल्सच्या तिकीट दर बदलपुण्यातून राज्यातील सर्व भागात एसटी धावतात. परंतु काेकणात २०० बस गेल्यामुळे ट्रॅव्हल्सधारकांकडून तिकीट दरात १०० ते २०० रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. परंतु प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने खासगी बसला गर्दी कमी आहे.
कोणत्या आगारातून किती बसशिवाजीनगर - २०स्वारगेट पाच - ०५भोर - १०नारायणगाव - २५राजगुरूनगर - २५तळेगाव - १५शिरूर - २५बारामती - ३०इंदापूर - २०सासवड - १५दाैंड - १०मंचर - १०
पुणे विभागातून यंदा गणपतीसाठी कोकणात २३० बस पाठविण्यात आल्या आहेत. यातील काही बस माघारी आल्या असून, सर्व मार्गावरील बस फेऱ्या सुरळीत सुरू आहेत.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे