शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मित्रानेच केला सेवानिवृत्त शिक्षकावर अ‍ॅसिडहल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 23:14 IST

मित्रानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरबागेसमोरील रोडवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकास  खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पुणे : मित्रानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरबागेसमोरील रोडवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकास  खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  भारत  खंडु साबळे (वय ६०, रा.सनसिटी, सिंहगड रोड )असे जखमी झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. स्वारगेट पोलिसांनी मनोज चव्हाण (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत साबळे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत.  ते रेंजहिल्स येथील एका शाळेतून सहा महिन्यापूर्वी निवृत्त झाले़ मनोज चव्हाण व साबळे हे गेल्या १८ ते २० वर्षांपासून मित्र असून त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मनोज चव्हाण हा पुणे महापालिकेच्या टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात लिपिक या पदावर नोकरीला आहे. साबळे हे सोमवारी दुपारी सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील फुटपाथवरुन पायी जात होते. त्यावेळी मनोज चव्हाण तेथे आला. बोलता बोलता त्याने साबळे यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले अ‍ॅसिड फेकले. त्यात साबळे यांचा चेहरा, मान व गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने ते भाजले. त्यानंतर चव्हाण तेथून पळून गेला. 

साबळे यांनी ही माहिती आपल्या मुलाला फोन करुन सांगितली. नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाचच्या दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली़ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन याची माहिती घेतली. चव्हाण याने साबळे यांच्यावर का हल्ला केला त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा