शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पुणे: नवीन चप्पल आणली नाही म्हणून मित्राने डोक्यात दगड घालून केली हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:37 IST

राम घरी आला तेव्हा दत्ताने मी सांगितलेली नवीन चप्पल तू का नाही आणली ? अशी विचारणा केली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यातून...

पिंपरी : नवीन चप्पल का नाही आणली ,या कारणावरून आरोपीने सहका-याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना 24 सप्टेंबरला चिंचवड येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. राम स्नेही (वय ३२ ) या तरूणाच्या खून प्रकरणी रामदूत बर्सिंग राजपूत उर्फ दत्ता मच्छीवाला (वय ४६ रा. मोहनगाव, मध्यप्रदेश) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने ४ आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) यांनी पत्रकार परिषदेत दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता मच्छीवाला व राम स्नेही हे चिंचवड परिसरात सेंटरींगचे काम करत होते. खून झाला त्या रात्री दोघेही दारू प्याले. दोघेही एकाच खोलीत राहत होते.राम घरी आला तेव्हा दत्ताने मी सांगितलेली नवीन चप्पल तू का नाही आणली ? अशी विचारणा केली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यातून आरोपीने रामच्या  बाजुला पडलेला दगड रामच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी झाल्याने रामचा मृत्यू झाला. रामच्या खुनाचा तपास करीत असताना, चिंचवड पोलिसांना अडचणी आल्या. या दोघांना ओळखणारे कोणीच नव्हते. मुळचे परप्रांतिय परंतू काही दिवसांपुर्वीच शहरात आलेल्या या दोघांविषयी कोणाला काहीच माहिती नव्हती. मृत रामच्या  खिशात आधारकार्ड होते. त्याच आधारावर पोलिसांनी त्याच्या नातेवाइ्कांशी संपर्क साधुन मृत व्यकती राम सनेही असल्याची खात्री करून घेतली. मोबाईल लोकेशन ट्रेस करून मुंबईपर्यंत आरोपीचा मागोवा घेतला. तो तेथून उत्तरप्रदेशला गेला असल्याचे समजले. चिंचवड पोलिसांनी विशेष पथक नेमून त्याला उत्तरप्रदेश येथून अटक केली.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलिस निरीक्षक गुन्हे विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ सोडनवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष डिगे, पोलीस नाईक स्वप्नील शेलार, सुधाकर आवताडे, विजकुमार आखाडे, ऋषिकेश पाटील, महिला पोलीस कांचन घवले, रुपाली पुरीगोसावी, पोलीस शिपाई चंद्रकांत गडदे, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, सचिन ढवळे, नितीन राठोड,राहूल मिसाळ, विशाल आंबटवार यांनी केली.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPuneपुणे