शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : शहरात चार नवीन वाहन तपासणी, ट्रॅक परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:47 IST

वाहन योग्यता तपासणीसाठी शहर आणि परिसरात चार नवीन चाचणी मार्ग (टेस्ट ट्रॅक) उभारण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथे, तर अवजड वाहनांची दिवे घाटात चाचणी होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

पुणे : वाहन योग्यता तपासणीसाठी शहर आणि परिसरात चार नवीन चाचणी मार्ग (टेस्ट ट्रॅक) उभारण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथे, तर अवजड वाहनांची दिवे घाटात चाचणी होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.पुण्याच्या वाढत्या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पालकमंत्री बापट, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, बापू भावे, प्रदीप भालेराव, राजन जुनवणे, रावसाहेब कदम, बाबा कांबळे उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘दिवे घाटातील चाचाणी मार्गासाठी आवश्यक १.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन चाचणी मार्गांसाठी योग्य जागांचा शोध घेऊन त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. स्कूल बस व महाराष्ट्र परिवहनच्या बस नोंदणीला प्राधान्य देण्यात येईल. रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापण्यासाठी कामगारमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल.पुण्यात दररोज ७०० जणांची तपासणी-पुण्यात दररोज पाचशे ते ७०० वाहने तपासणीसाठी येत असतात. त्याचा यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी दहा अधिकारी सहा महिन्यांसाठी पुणे परिवहन विभागात देण्यात येणार असून, सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील.वाहनांच्या आनलाईन नोंदणी संदर्भात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. तसेच पुणे शहरातील वाहतुकीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.रिक्षांसाठी अ‍ॅप-ओला, उबेर यासारख्या कंपन्यांमुळे रिक्षाचालकांना मोठा फटका बसू लागला आहे. चारचाकी वाहनांसह रिक्षांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इतर रिक्षाचालकांचा व्यवसाय कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता ओला, उबेरला टक्कर देण्यासाठी अन्य रिक्षांसाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.आरटीओच्या मार्गदर्शनाखाली हे अ‍ॅप तयार केले जाणार आहे. या अ‍ॅपवरून प्रवाशांना रिक्षा बुक करणे शक्य होईल. या अ‍ॅपमुळे रिक्षाचालकांकडून प्रवासी नाकारण्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच नागरिकांनाही चांगली सेवा मिळावी, असे अपेक्षित आहे.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापट