शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : उरळी कांचन येथील लाकडी गोदामाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 09:36 IST

उरळी कांचन येथे शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास लाकडी गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

पुणे - उरळी कांचन येथे शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास लाकडी गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील ही घटना आहे.  या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.  

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दल हडपसरची एक फायरगाडी व मुख्यालयातून दोन वॉटर ब्राऊझर टँकरसहीत घटनास्थळाकडे रवाना झालं. घटनास्थळी दोन सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, घटनास्थळाहून 3 सिलिंडर जवानांनी बाहेर काढले. दरम्यान, साडी, लाकडी फर्निचर व भंगार तसेच जुन्या लाकडी वस्तूंच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत येथील सर्व दुकानं जळून खाक झाली आहेत. 

2 ते 15 गुंठ्यांमध्ये साडीचे गोडाऊन व जुन्या सागवानी लाकडाचे मोठे गोडाऊन जळाले आहे. दरम्यान, साडीच्या दुकानात सर्वात आधी आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.  दीड तासांच्या अथक प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 

यामध्ये श्रीकृष्ण होलसेल साडी डेपो, तुळजाभवानी टिंबर्स,श्रीदत्त फर्निचर, श्री समर्थ फर्निचर, मोनाली एन्टरप्रायजेस अशी पाच ते सहा दुकानांची आगीत राख झाली आहे. या दुर्घटनेत सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आग लागण्यामागील कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.  

टॅग्स :AccidentअपघातfireआगPuneपुणे