शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धायरी येथील कचरा प्रकल्पास लागली आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:52 IST

या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्याने सजग नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळविले.

धायरी - सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका कचरा प्रकल्पास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला असून प्रकल्पा शेजारी मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.नऱ्हे - धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ असलेल्या या कचरा प्रकल्पाला पहाटे अडीच-तीनच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्याने सजग नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवळ मिळतात का घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले. या ठिकाणी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचऱ्याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे.

जेसीबी बोलून कचऱ्याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू आहे. या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र, सुदैवाने आग पसरली नाही. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे.नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

याआधीही कचरा प्रकल्पास आग...जून २०२२ मधेही या कचरा प्रकल्पास अशाच प्रकारे आग लागली होती. कचरा प्रकल्प हा रहिवाशी वस्तीत असल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच आग लागली की लावली गेली याबाबत नागरिकात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआग