शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

पुणे फेस्टिव्हलचे हेमा मालिनी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 20:14 IST

पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत असून १३ ते २३ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे.

ठळक मुद्देकला,नृत्य,वादन, गायनाची पर्वणीडॉ. डी. वाय. पाटील, श्रीनिवास पाटील, हणमंत गायकवाड आणि विक्रम गोखले यांचा सन्मान

पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहरी संगम असलेल्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते होणार आहे. यंदा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड आणि अभिनेते विक्रम गोखले यांना 'पुणे फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड'  या सन्मानाने गौरवले जाणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत असून १३ ते २३ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. पालकमंत्री गिरीष बापट व राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ प्रमुख पाहुणे आहे. शताब्दी साजरी करणा-या  साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर (गणेशोत्सव मंडळ) यांचा यंदा गौरव केला जाणार आहे. जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्य नृत्यांगना अरुंधती पटवर्धन  गणेशवंदना सादर करतील. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक, अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा स्वरांजली हा कार्यक्रम भाग्यश्री अभ्यंकर, सोनाली नांदुरकर, ऋषिकेश बडवे आणि हेमंत वाळूंजकर सादर करतील.  याबरोबरच   गोल्डन इरा आॅफ म्युझिक, जेष्ठ संगीतकार सी.रामचंद्र, सुधीर फडके, नौशाद अली, स्नेहल भाटकर, राम कदम व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भव्य वाद्यवृंदासह हिंदी मराठी गाण्यांचा 'सुहानासफर', अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन, आदी कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे समन्वयक कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुभाष सणस उपस्थित होते.  

टॅग्स :PuneपुणेHema Maliniहेमा मालिनीgirish bapatगिरीष बापटVikram Gokhaleविक्रम गोखले