शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune Fashion Street Fire : रौद्र रूप धारण केलेल्या अग्निकांडात स्वतःच्या जीवाची बाजी लावून मदतीला धावलेला 'अवलिया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:36 IST

विशेष म्हणजे या तरुणाचे फॅशन स्ट्रीट मध्ये कोणतेही दुकान नाही..

विक्रम मोरे-

पुणे : फॅशन मार्केट येथे रात्री ११ च्या दरम्यान लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत तांडव माजवले असतानाही येथे भीमपुरा येथील कुरेशी मोहल्ल्यात राहणाऱ्या काशिफ चौधरी या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावत इथल्या व्यावसायिकांचे सामान सुरक्षितपणे  कसे बाहेर काढण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न केले. आपल्या सर्व मित्रांना सोबतीला घेत त्याने प्रचंड वेगात कार्यरत असताना दिसून आला.

विशेष म्हणजे काशिफचे या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे दुकान नाही. केवळ आपली मित्र मंडळी येथे व्यवसाय करतात आणि आपण जवळच राहतो म्ह्णून एक सामाजिक कर्तव्य म्हणून कोणीही आत जाण्यासाठी तयार नसताना स्वतः धाडस करत जेवढं सामान काढता येईल तेवढं त्यानं बाहेर काढायला स्वतः सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मदतीला इतर जण देखील धावून आले. त्यामुळे थोडं काही समान वाचू शकले. सामान बाहेर काढल्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाच्या प्रशासनालाही त्याने सकाळी ६ वाजेपर्यंत मदत केली. हे करत असताना त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात आगीच्या वाफा लागल्या आणि डोक्यावरचे केसही जळाले.

याविषयी कशिफ चौधरी म्हणाला,  हे खूप वाईट झालंय, यामुळे अनेक तरुण आज रस्त्यावर आलेत. मी स्वतः त्या रात्री फायर ब्रिगेड ला फोन केला होता परंतु , ते ३० ते ४० मिनिटं उशिरा आले खरंतर त्यांना संचारबंदी असताना आणि रात्री ११ नंतर यायला ५ मिनिटं पुरेशी होती . जर ते वेळेत आले असते तर हा अनर्थ नक्की टाळला असता. हे  सांगताना त्याचा घसा पूर्णपणे बसला होता आणि  डोळ्यात अश्रू दिसून तरळत होते.

टॅग्स :PuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दल