शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : चाकण बाजारात मंदी, भाज्यांचे भाव गडगडल्यानं शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 18:26 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भाज्या मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाशिवरात्रीला 6  दिवस अवकाश असल्याने गुरुवारी बाजारात आंध्र प्रदेशातून आलेला 16 टन रताळी घेऊन आलेला ट्रक मागणी अभावी बाजारात उभा राहिला. ट्रक उभा करून त्या व्यापाऱ्याला उद्या, परवाच्या बाजाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथील बाजारात बटाटा ७०० रुपये, तर कांद्याला १७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी विभागात वातावरणातील बदलामुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन भाज्यांचे भाव गडगडले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मेथीची बाजारात मोठी आवक झाली.

भाज्यांना प्रतिकिलोस मिळालेले भाव

कोबी - 2 ते 3 रुपये 

फ्लॉवर - 2 ते 3 रुपये 

टोमॅटो - 4 ते 5 रुपये 

बीट - 2 ते 4 रुपये 

दुधी भोपळा - 4 ते 5 रुपये 

ढोबळी मिरची - 10 ते 12 रुपये 

काकडी - 10 ते 15 रुपये 

गाजर - 12 ते 14 रुपये 

वाटाणा - 15 ते 20 रुपयेतेजीत असलेल्या भाज्या

भेंडी - 20 ते 25  रुपये 

गवार - 25  ते 30 रुपये 

शेवगा - 30 ते 35 रुपये 

हिरवी मिरची - 30 ते 35 रुपयेपालेभाज्यांचे जुडीचे भाव पुढीलप्रमाणे

शेपू - दीड ते 2 रुपये 

मेथी - 2 ते 3 रुपये 

पालक - 2 रुपये 

कोथिंबीर - 2 रुपये 

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे