शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला; आतापर्यंत ७६ लाख शेतकऱ्यांना मिळाला ओळख क्रमांक

By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 09:48 IST

राज्यात असे १५ लाखांहून अधिक अर्ज तलाठ्यांच्या मान्यतेविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

पुणे : ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.दरम्यान, आधार कार्डावरील माहिती आधारे हे ओळखपत्र देण्यात येत असून, आधारमधील ८० टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक देण्यात येत आहेत. आता त्यापेक्षा कमी माहिती जुळत असली तरी पडताळणी करून अशा अर्जांवरही तलाठ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत. मात्र, असा अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार तलाठ्यांनाच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात असे १५ लाखांहून अधिक अर्ज तलाठ्यांच्या मान्यतेविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने या योजनेचा २० वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांरणाद्वारे जमा केला आहे. मात्र, २१ व्या हप्त्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी सहभाग वाढविला आहे. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.

यात आतापर्यंत आघाडीवर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने अव्वल क्रमांक कायम ठेवला असून, जिल्ह्याने ओळख क्रमांकाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ९८८ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ लाख ५० हजार ६४० शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.

जिल्हानिहाय ओळख क्रमांक

अकोला १५,१२७८

अमरावती २४,७२६६

बुलढाणा ३०४७३७

वाशिम १३१२५९

यवतमाळ २६६५९०

बीड २९०१९५

संभाजीनगर २५२८७१

धाराशिव १७५९०६

हिंगोली १४८५९४

जालना २२०२४२

लातूर १९९४७५

नांदेड २५१०१७

परभणी १८५००३

पालघर ७८२०१

रायगड ७४४९२

रत्नागिरी ११२५३४

सिंधुदुर्ग ७३४१६

ठाणे ५४,२५८

भंडारा १६२१५८

चंद्रपूर १९२५१६

गडचिरोली १२१५६५

गोंदिया १९०६४४

नागपूर १४७३२८

वर्धा १५२७५१

अहिल्यानगर ५०९९८८

धुळे १४९८१८

जळगाव ३७६८७८

नंदुरबार ९५५८२

नाशिक ४५०६४०

कोल्हापूर ३८३५४२

पुणे ४३४६३२

सांगली २६४७३२

सातारा ४०३१६६

सोलापूर ३८९२३२

मुंबई उपनगर ३४६

एकूण : ७६,३९,८५२

राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. तलाठ्यांकडून योजनेला गती देण्यात आली आहे. तसेच आधार माहिती जुळण्याबाबत पडताळणी करून तो अर्ज मान्य करण्याबाबत सांगण्यात आले आहे. - सरिता नरके, राज्य संचालक, ॲॅग्रीस्टॅॅक, भूमिअभिलेख विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र