शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीला कौटुंबीक वादाच्या प्रकरणातून मिळतोय 'सुकून'..!

By नम्रता फडणीस | Updated: April 17, 2025 13:25 IST

जेणेकरून दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतील. आता दोघे पुन्हा एकत्र राहात आहेत

पुणे : पती शेती सांभाळून नोकरीदेखील करायचा. पत्नीचे म्हणणे होते की, पती तिला वेळच देत नाही. दोघांमधील वाद इतके टोकाला गेले पतीला नोकरी सोडावी लागली. मात्र, तो फक्त शेतीच करतो म्हणून पत्नीच्या माहेरचेही वाद उकरून काढायला लागले. यादरम्यान पत्नी गर्भवती राहिल्याने तिचे कुटुंब तिला माहेरी घेऊन आले. त्यांनी पुण्याच्या न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. तो दावा उच्च न्यायालयात गेला. हे प्रकरण 'सुकून' समुपदेशन केंद्राकडे आले. तीन दिवसात उच्च न्यायालयाने अहवाल देण्यास सांगितला. दोघांसह कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. दोघांना वेगळे राहण्याचा सल्ला देऊन मध्य मार्ग काढण्यात आला. जेणेकरून दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतील. आता दोघे पुन्हा एकत्र राहात आहेत. हे एक ‘सुकून' समुपदेशन केंद्रातील यशस्वी उदाहरण!महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) यांच्या वतीने कौटुंबीक न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आठ महिन्यांपूर्वी 'सुकून' हे समुपदेशन केंद्र सुरू झाले आहे. कौटुंबीक वादातील पक्षकारांमध्ये सलोखा निर्माण करण्यासह त्यांच्यातील राग व दुरावा कमी करणे, हा 'सुकून'चा मुख्य उद्देश आहे. या केंद्राकडे उच्च न्यायालय व जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली कौटुंबीक वादाची प्रकरणे पाठविली जातात. आठ महिन्यामध्ये केंद्राकडे २३ प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यातील २१ प्रकरणे निकाली काढण्यात केंद्राला यश आले आहे. यात काही दाम्पत्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट, तर काही प्रकरणात दाम्पत्य पुन्हा सुखासमाधाने नांदायला गेली आहेत.जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये कौटुंबीक वादाची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. काही प्रकरणात कधी पक्षकारांना पुन्हा समुपदेशन करावेसे वाटते किंवा कधी न्यायाधीशही पक्षकारांना समुपदेशनाचा सल्ला देतात. कौटुंबीक वादाच्या प्रकरणात 'सुकून' केंद्रातील समुपदेशकांकडून पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन केले जात असून, प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनाली पाटील यांनी सांगितले.'सुकून' समुपदेशन केंद्राची वैशिष्ट्ये- उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेली वैवाहिक व कौटुंबीक वादाची प्रकरणे उदा.: घटस्फोट, पालकत्व, मुलांचा ताबा, भेट मिळणे, पोटगी, कौटुंबीक हिंसाचार, इत्यादी प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये मोफत समुपदेशन सेवा पुरविण्यात येते.-प्रलंबित वैवाहिक किंवा कौटुंबीक वादामुळे निर्माण झालेला नात्यातील दुरावा नाहीसा करून परत नातेसंबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते.-पक्षकारांमध्ये सामंजस्याचे वातावरण निर्माण करून प्रलंबित प्रकरणे व वाद सोडविण्यास तसेच भावी आयुष्याच्या योजना आखण्यास, मार्गक्रमण करण्यास केंद्र मदत करते.-जिंकणे किंवा हरणे यास स्थान न देता उभय पक्षकारांमध्ये असलेला वाद सोडवून त्यांच्यात पूर्वीसारखे मधुर संबंध कसे आणता येतील, यासाठी प्रयत्न केले जातात.- प्रकरणातील माहिती गोपनीय ठेवली जाते आणि कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत त्याचा उपयोग करता येत नाही. तसेच माहिती अधिकार या केंद्रास लागू होत नाही.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदारMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड