Pune Dog Attack Video: हा व्हिडीओ बघितल्यानंतर रात्रीच्या वेळी एकटं फिरायची तुम्हालाही भीती वाटेल. पिंपरी चिंचवडमधील चिखली मोरे वस्तीवर ही घटना घडली आहे. पहाटे कामावर निघालेल्या एका तरुणावर अचानक काही कुत्र्यांनी हल्ला केला. पण, तरुणाने वेळीच दुचाकीचा आश्रय घेतला आणि कुत्र्यांच्या तावडीतून सुटका स्वतःची सुटका केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भटक्या कुत्र्यांच्या मुद्दा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे. भटक्या कुत्र्यांचं काय करायचं हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशातच पिंपरी चिंचवडमधील मोरे वस्ती साने कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पाठीमागून आले कुत्रे आणि हल्ला केला
मोरे वस्तीतील साने कॉलनीमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यात एक तरुण पहाटे कामावर निघाला. त्यावेळी एकट्या तरुणाला बघून मागून काही कुत्री धावतच आली. त्यातील एका कुत्र्याने त्याच्या हाताचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाने लगेच दुचाकीच्या मागे आश्रय घेतला.
कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्यानंतर तरुणाने आरडाओरड केली. कुत्रेही भुंकले. त्यामुळे इमारतीतील लोक बाहेर आले. लोकांच्या आवाजाने कुत्रे दबकले, पण बराच वेळ तिथेच रस्त्यावर घुटमळत राहिले. या घटनेने या परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबद्दल दहशत निर्माण झाली आहे.
कुत्री तरुणावर हल्ला करतानाचा व्हिडीओ बघा
शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कुत्रे तरुणावर हल्ला करतानाची घटना थरकाप उडवणारी आहे. या घटनेनंतर आता भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील लोकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.