शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 18:02 IST

बारावीच्या निकालात विभागात पिछाडीवर पडलेल्या पुण्याने दहावीच्या निकालामध्ये सगळीकडे कसर भरून काढली

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला असून एकुण १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्णराज्याच्या निकालाप्रमाणेत विभागातही मुलींचीच बाजी

पुणे : इयत्ता बारावीच्या निकालात पुणे विभागात पिछाडीवर पडलेल्या पुणे जिल्ह्याने दहावीच्या निकाल अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला असून एकुण १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सोलापुर जिल्ह्यातील ९७.५३ आणि अहमदनगर मधील ९६.१० टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचा एकुण निकाल ९७.३४ टक्के इतका लागला आहे. विभागात एकुण २ लाख ५७ हजार ८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ५० हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १ लाख २ हजार २८२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी व ९२ हजार ५८९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. विभागात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १ लाख २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापुर जिल्ह्यातील ६३ हजार १९३ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार ६३३ विद्यार्थी तर नगर जिल्ह्यातील ६९ हजार ५३ पैकी ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

राज्याच्या निकालाप्रमाणेत विभागातही मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या एकुण १ लाख १६ हजार ४५२ मुलींपैकी १ लाख १८ हजार ४१९ मुली उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.३३ एवढी आहे. तर १ लाख ३३ हजार ७१६ मुले उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९६.४८ एवढी आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५९ हजार ६९७ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९८.६२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. -----------विभागनिहाय निकालजिल्हा परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारीपुणे १,२४,७८२ १,२२,१७५ ९७.९३अहमदनगर ६९,०५३ ६६,३६० ९६.१०सोलापूर ६३,१९३ ६१,६३३ ९७.५३------------------------------------------------------एकुण २,५७,००८ २५,०१६८ ९७.३४--------------------------------------------------------मुले व मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारीजिल्हा मुले मुलीपुणे ९७.२८ ९८.६२अहमदनगर ९४.९१ ९७.५९सोलापूर ९६.७२ ९८.५१-----------------------------------

 

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण