शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

ओतूरच्या शेतकऱ्याने घेतली ‘शुगर फ्री लाल केळी’तून आर्थिक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:44 IST

- माळरानावर एक एकर क्षेत्रात लाल केळीच्या १००० रोपांची लागवड : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले यशस्वी केळीचे उत्पादन

- महेश घोलप ओतूर : शेतात वेगवेगळे प्रयोग करत चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता वाढ होत आहे. यामुळे शेतीतून चांगले उत्पादन घेऊन फायदा करून घेत आहेत. यातच ओतूर येथील एका शेतकऱ्याने शेतात शुगर फ्री असलेल्या लाल केळीचे लागवड करण्याचा प्रयोग केला. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, यातून चांगले उत्पादन या शेतकऱ्याला मिळत आहे. जुन्नर तालुक्यातील मांडवी खोऱ्यातील ओतूर येथील प्रगतशील शेतकरी शरद आनंथा फापाळे यांनी केळी हे पीक आपल्या माळरानावरील काळी भुरकट एक एकर क्षेत्रात घेतले असून, लाल केळी या जातीचे १००० रोपे लागवड केली असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी केळीचे उत्पादन घेतले आहे.पाहिले शेतीची मशागत करून त्यात २ ट्रोल्या शेणखत टाकून बेड पाडून वर डबल पद्धतीने ठिबक सिंचन करून बेडवर ४ फुट रुंदीचे ७/६ अंतर सोडून केळी लागवड केली, तर दोन दिवसांनंतर २ तास पाण्याची मात्रा द्यावा, केळीची पीक वेळेवर काढावे, म्हणजे केळीची वाढ चांगली होते. कमीत कमी दोन वेळा फवारणी, तर ३ वेळा ड्रचीग करावी, त्यामुळे केळीचे उत्पन्न वाढते. संभाजीनगर येथून १ लाल केळीप्रमाणे १५ मार्च २०२४ रोजी लागवड केली. आता केळीचे पीक १२ महिन्यांचे होऊन गेले आहे. केळीला ५ ते ६ फण्या, तर १४ महिन्यांच्या केळी झाल्यावर अंदाजे १५ ते १८ किलोचा लंगर होईल, असे वाटते. सध्या लाल केळीचे उत्पन्न पहिल्यांदा घेतले आहे, त्यातून दीड ते पावणेदोन टन उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.या केळीमध्ये नैसर्गिकरीत्या साखरेचे प्रमाण कमी असते. मधुमेह रुग्ण आणि आरोग्याबाबत जागरूक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. पण, याबाबत अजून जनजागृती नसल्याने इतर केळीप्रमाणेच या लाल केळीला सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. या केळी विषयी जनजागृती झाल्यास सर्वसाधारण केळीपेक्षा तीन ते चार पटीने अधिक बाजारभाव मिळू शकतो. त्यामुळे मी स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मदतीने लाल केळी पीक घ्यावयाचे ठरवले. त्यानुसार लागवड करण्याचा निर्णय घेतला. केळीच्या उत्पादनासाठी कमी पाणी आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. ज्यामुळे पर्यावरणपूरक शेतीलाही चालना मिळाली आहे.

लाल केळीची ही खास जात केवळ रंगाने आकर्षक नाही, तर लाल केळीची खासियत म्हणजे त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पारंपरिक केळीच्या तुलनेत या जातीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे प्रमाणही जास्त असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. - गणेश भोसले. जुन्नर तालुका कृषी अधिकारीमधुमेह रुग्णांसाठी लाल केळी ही पर्वणी ठरू शकते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक नवीन पिकाचा पर्याय उपलब्ध होऊन केळीचे क्षेत्र या नवीन बदलामुळे पुन्हा एकदा वाढू शकते. याचा निश्चितपणे फायदा जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांनी भविष्यात या संधीचा अभ्यास करून लाभ घ्यावा.- ऋषिकेश तांबे, कृषीतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र