शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांची होतेय लूट..!'उच्च सुरक्षा नंबर प्लेट'साठी पैसे भरूनही वेळेवर मिळेना सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:09 IST

-प्लेट बदलण्यासाठी राज्य सरकारकडून ३० जूनपर्यंत मिळाली मुदत

- अंबादास गवंडीपुणे : राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी काही ठिकाणी अव्वाच्या सवा दर आकारले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांची लूट होत असून, पैसे भरूनही दिलेल्या तारखेनुसार उच्च सुरक्षा पाटी मिळत नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची दुहेरी फटका बसत आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, ज्या-ज्या कंपनीला काम देण्यात आले आहे, त्यांच्याकडे असलेली यंत्रणा तोकडी ठरत आहे. दुसरीकडे वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. शिवाय नंबर प्लेट लावण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या आहेत अडचणी  ग्रामीण भागात फिटमेंट सेंटर नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.दुचाकी वाहनांसाठी केवळ १७०० फिटमेंट सेंटर.अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढले, परंतु यंत्रणा तोकडी असल्याने वेळेवर नंबर प्लेट मिळेना.ऑनलाइन अर्ज करताना नागरिकांना अडचणी.फिटमेंट सेंटर वाढविण्याकडे दुर्लक्ष उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काममिळालेल्या कंपन्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील परिस्थिती २ अतिशय बिकट असून, त्याकडे परिवहन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच काही फिटमेंट चालक आरसी बुक, चेसिस क्रमांकाची कोणतीही पूर्वतपासणी न करता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सुरक्षा पाटी देण्यात येत आहे. त्यामुळे पाटी हरवली किंवा त्याचा गैरवापर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरिकांचे हेलपाटेउच्च सुरक्षा नंबर पाटीबाबत ग्रामीण भागात लुटमार सुरू आहे. सुरक्षा नंबर प्लेटची नोंदणी करण्यापासून ते बसविण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लूटच सुरू आहे. ग्रामीण भागात अनेक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती नाही. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १०० ते २०० रुपये लागत आहेत. ग्रामीण भागात कंपन्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच फिटमेंट सेंटर आहेत. त्यासाठी नागरिकांना ६० ते ७० किलोमीटर जावे लागते.

एचएसआरपी बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, राज्यात एक हजार ७०० फिटमेंट सुरू करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यात फिटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत नंबरप्लेट बसवून घ्यावी.- विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस