शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उत्पन्नाची एक्सप्रेस सुसाट; पुणे विभागाच्या उत्पन्नात सहा टक्के वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 05:00 IST

भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र असले तरी पुणे विभागाला सुगीचे दिवस..

ठळक मुद्देया आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विभागाला सुमारे ८४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मागील वर्षभरात रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार सोडल्या विशेष गाड्या

पुणे : रेल्वे तोट्यात असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून केला जात असला तरी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उत्पन्न मात्र वाढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विभागाच्या उत्पन्नात ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विभागाला सुमारे ८४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हा आकडा २०१९-२० मध्ये ९०२ कोटी रुपयांवर गेला आहे. भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. ‘कॅग’नेही यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे तिकीट दरामध्ये वाढ करण्याचे संकेत रेल्वेकडून सातत्याने दिले जात होते. काही दिवसांपूर्वीच उपनगरी गाड्या वगळून अन्य गाड्यांच्या तिकीट दरात काही प्रमाणात वाढ केली. पण ही वाढ किरकोळ असल्याने प्रवाशांकडून त्याला विरोध झाला नाही. रेल्वेला प्रामुख्याने माल वाहतुकीतून खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळते. तर तिकीट विक्रीतून तोटा होत असल्याचा दावा रेल्वेचे अधिकारी करतात. प्रवासी गाड्यांवरील एकुण खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जातो. त्यामुळे प्रवाशांना सवलत न घेण्याचे आवाहन रेल्वेकडून केले जाते. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. असे असले तरी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत ६.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ यावर्षी एप्रिल ते डिसेंबरदरम्यान पुणे विभागाला तिकीट विक्रीतून सुमारे ६३४ कोटी रुपये तर २०१९-२० मध्ये ६७३ कोटी रुपयांचा महसुल मिळाला. यामध्ये ६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. माल वाहतुकीमध्येही ५.३ टक्क्यांची वाढ दिसून येते. २०१८-१९ मध्ये १४८ कोटी रुपये महसुल जमा झाला होता. हा आकडा २०१९-२० मध्ये १५६ कोटींवर पोहचला. तिकीट तपासणीतून मिळणारा महसुलही सुमारे २ कोटी रुपयांनी वाढले आहे. तर एकूण महसुलात ६.२ टक्के म्हणजेच सुमारे ५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. --मागील वर्षभरात रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष  गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही नवीन गाड्याही सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यामध्ये  पुणे ते मुंबईदरम्यानची वाहतूक अनेक दिवस विस्कळीत राहिली होती. त्यामुळे काही इंटरसिटी एक्सप्रेस सातत्याने रद्द कराव्या लागत होत्या. त्याचा मोठा फटका रेल्वेला बसला असला तरी महसुलात वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वेकडील ओढा वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.......................

रेल्वेच्या पुणे विभागाला मिळालेला महसुल (एप्रिल ते डिसेंबर)महसुल                              २०१८-१९                             २०१९-२०                        फरक (टक्के)प्रवासी                        ६३४ कोटी ९५ लाख                 ६७३ कोटी ९१ लाख                ६.१माल                          १४८ कोटी ७२ लाख                  १५६ कोटी ५५ लाख                 ५.तिकीट तपासणी        १२ कोटी २० लाख                    १४ कोटी ४० लाख                ७.७एकूण                        ८४९ कोटी ३७ लाख               ९०२ कोटी २० लाख                  ६.२

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासी