शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पुणे : सायबर फसवणूक वाढली : ७ वर्षांत तक्रारींचा आकडा साडेचार हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 06:06 IST

दामदुपटीने परताव्याचे आमिष... काही न करता मिळालेले लॉटरीचे बक्षीस... अशा नाना प्रकारचे आमिष दाखवीत फसवणूक करीत असल्याचे समोर येत असले तरी याला बळी पडणा-यांच्या संख्येत भयंकर वाढ होत असल्याची माहिती सायबर सेलकडून प्राप्त झाली आहे.

विशाल शिर्के पुणे : दामदुपटीने परताव्याचे आमिष... काही न करता मिळालेले लॉटरीचे बक्षीस... अशा नाना प्रकारचे आमिष दाखवीत फसवणूक करीत असल्याचे समोर येत असले तरी याला बळी पडणा-यांच्या संख्येत भयंकर वाढ होत असल्याची माहिती सायबर सेलकडून प्राप्त झाली आहे. शहरात २०१२ साली सायबर सेलकडे २१७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात या वर्षी १० महिन्यांतच ४ हजार ४९६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.अनेकांना तुम्हाला अमुक लाख डॉलर, युरो अथवा रुपयांचे बक्षीस लागल्याचे मेल अथवा मोबाईलवर मेसेज येतात. कधी मोबाईल टॉवरसाठी महिना लाख रुपये देऊ, त्याच्या प्रक्रियेसाठी अमुक रक्कम भरा, परदेशात नामांकित कंपनीत नोकरीची संधी असल्याचे संदेश प्रसारित केले जातात. विश्वास संपादन करण्यासाठी संबंधित कंपनीचे बनावट पत्रदेखील केले जाते. या प्रक्रियेपोटी लाखो रुपये उकळले जातात.कधी मी तुमच्या बँकेतून बोलत असून, तुमचे खाते ब्लॉक होईल, असे सांगून डेबिट कार्डचा संकेतांक अथवा कार्डक्रमांक मिळविला जातो. खात्यातून पैसे गेल्यावरच त्याची माहिती कळते. गेल्या महिन्यात पुण्यातील एका व्यापाºयाला १ कोटी ४ लाखांना लुबाडण्यात आले होते. या प्रकरणात भारतात मिळणाºया हर्बल आॅईलला ब्रिटनमध्ये चांगला भाव मिळतो असे व्यापाºयाला भासविण्यात आले. या टोळीने संबंधित व्यापाºयाला खाद्यतेलाची १ लाख ४५ हजार रुपये लिटर दराने विक्री केली. या सर्व घटनांत चांगले वेतन, कमी कालावधीत दामदुप्पट परताव्याचे आमिष हा समान दुवा आहे.अशा घटना उघडकीस येत असतानाही नागरिकांच्या ‘लोभा’चा निर्देशांक कमी होताना दिसत नाही. शहरात २०१२ साली २१७ तक्रारी सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. सप्टेंबर २०१७ अखेरीसच त्यात ४ हजार २५ पर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच सात वर्षांत ही वाढ जवळपास २० पट इतकी अहे. मात्र, त्या तुलनेत गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. शहरात २०१२ साली २१७ तक्रारींच्या तुलनेत ४२ प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या वर्षी ४ हजार २५ तक्रारींपैकी २६० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.

टॅग्स :Puneपुणे