पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या कारणावरून 23 वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय 23) असे असून तो शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे राहत होता. नागेश हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आईला मदत करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास नागेशला मोबाईलवर फोन आला. फोन आल्यानंतर तो घरातून मोटरसायकलवरून बाहेर पडला. त्यानंतर काही वेळातच रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरून त्याच्या आईला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करत नागेशला कोथरूडमधील मेगासिटी परिसरात मारहाण केल्याचे सांगितले. तसेच “10 मिनिटांत येऊन तुमचा मुलगा घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ,” अशी धमकी दिली. धमकीचा फोन मिळताच नागेशची आई आणि काही नातेवाईक तातडीने कोथरूडमधील मेगासिटी परिसरात पोहोचले. त्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. नातेवाईक टेरेसवर पोहोचले असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि आजूबाजूला लाकडी दांडके पडलेले होते.
Web Summary : In Pune, a 23-year-old was fatally beaten over his friendship with a minor girl. He was lured outside, assaulted with wooden sticks, and left severely injured. Witnesses reported a group beating the victim. The incident raises concerns about Pune's law and order.
Web Summary : पुणे में एक नाबालिग लड़की से दोस्ती के कारण 23 वर्षीय युवक की बेरहमी से हत्या कर दी गई। उसे बाहर बुलाया गया, लाठियों से पीटा गया और गंभीर रूप से घायल छोड़ दिया गया। प्रत्यक्षदर्शियों ने एक समूह द्वारा पीड़ित को पीटने की सूचना दी। घटना ने पुणे की कानून व्यवस्था पर सवाल खड़े कर दिए हैं।