शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पत्नी, सासरच्या त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:21 IST

पुणे : पत्नी आणि सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट ...

पुणे : पत्नी आणि सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यावरून हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुचित्रा योगेश धनवडे (वय ४०) आनंदा धनवडे (रा. सातववाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. योगेश रूपचंद धनवडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी सुरेखा रूपचंद धनवडे (वय ६५, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धनवडे हा सध्या बेरोजगार होता. त्यावरून पत्नी सुचित्रा व सासरे आनंदा हे त्याला बोलत असत. त्यांच्यात नेहमी भांडणे होत. दोघांच्या त्रासाला कंटाळून योगेश याने सावतवाडी येथील घरात १० नोव्हेबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. तसेच योगेशने त्याचा भाऊ दिव्यरत्न यालादेखील पत्नीच्या आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पाठवली होती. याप्रकरणी आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी