शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मित्रासोबत कोथरूड परिसरात गप्पा मारत असतांना अचानक...; कोथरूड गोळीबार प्रकरणाची A टू Z स्टोरी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 21:00 IST

रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास साइड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर गोळीबारात एक तरुण जखमी झाला

पुणे : नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कोथरूड भागात एका तरुणावर गाेळीबार करण्यात आल्याची घटना घडली. रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास साइड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर गोळीबारात एक तरुण जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोथरूड पोलिस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या मुठेश्वर मित्रमंडळासमोर बुधवारी (दि. १७) रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हा प्रकार घडला. याप्रकरणातील आरोपींनी त्यानंतर पुढच्या १० मिनिटांत आणखी एका इसमावर जुन्या वादाच्या कारणावरून मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराईतांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोळीबारामध्ये प्रकाश मधुकर धुमाळ (३६, रा. थेरगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे, तर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात वैभव तुकाराम साठे (१९, रा. कोथरूड) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्या फिर्यादीवरून मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक व अन्य सहकारी यांच्या विरोधात विविध कलमांसह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हे मित्रांबरोबर मुठेश्वर मित्रमंडळासमोर रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. दुचाकीवरून घायवळ टोळीतील गुंड तेथे आले. गाडीला साईड दिली नाही, म्हणून त्यांच्यात वाद झाले. त्यातून त्यांच्यातील मयूर कुंभारे याने त्याच्याकडील पिस्टलमधून गोळीबार केला. ही गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली. गोळी लागून जखमी झालेले धुमाळ तेथून पळत पाठीमागे असलेल्या घरासमोरील पाण्याच्या टाकीआड लपून बसले. त्यानंतर हे गुंड तेथून पळून गेले. 

 प्रकाश धुमाळ हे खेड-शिवापूर येथे पार्टी करण्यासाठी त्यांच्या मित्रांसह गेले होते. एका मित्राला सोडण्यासाठी ते या परिसरात आले असता गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून गुंड तेथे आले. त्यांच्यातील एकाने धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली.  - संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड