शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

उसने पैसे देवाण-घेवाणीवरून झाले किरोकोळ वाद; हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खूपसून वेटरने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:07 IST

पहिल्या दोन वेळा शेट्टी यांनी त्याला पैसे दिले परंतु वारंवार त्याने पैसे मागायला सुरवात केली, त्यामुळे शेट्टी यांनी त्याला आधी काम चांगले कर मगच पैसे देईल असे सांगितले आणि पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे उमेशला शेट्टी यांचा राग आला होता.

पुणे :पुणे उसन्यापैशाच्या किरकोळ कारणावरून हॉटेलमधील वेटरने हॉटेल चालकाच्या मानेत चाकू भोसकून त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कोंढवे धावडे परिसरातील पीकॉक फॅमिली गार्डन, बार ॲण्ड लॉजिंग येथे घडली. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आह, तर वेटर उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) याला कोंढवे-धावडे पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संतोष शेट्टी यांनी कोंढवे धावडे येथील हॉटेल पीकॉक हे चालविण्यासाठी घेतले होते. २५ दिवसांपूर्वी उमेश गिरी हा त्यांच्याकडे वेटरच्या कामासाठी आला होता. तेंव्हा पासून तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. काम सुरु केल्यापासून दर चार-पाच दिवसांनी तो शेट्टी यांना उधारीवर पैसे मागत होता. पहिल्या दोन वेळा शेट्टी यांनी त्याला पैसे दिले परंतु वारंवार त्याने पैसे मागायला सुरवात केली, त्यामुळे शेट्टी यांनी त्याला आधी काम चांगले कर मगच पैसे देईल असे सांगितले आणि पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे उमेशला शेट्टी यांचा राग आला होता. त्यातून चार दिवसांपूर्वी त्यांची किरकोळ भांडणेही झाली होती. आज रात्री आठच्या सुमारास शेट्टी हॉटेलमध्ये बसले होते. त्यानंतर पुन्हा उमेशने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, शेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे उमेश आणि संतोष यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर उमेश शांतपणे किचनच्या दिशेने गेला.

किचनमधील चाकू घेऊन शांतपणे संतोष यांच्या मागून त्यांच्याजवळ आला. संतोष बेसावध असताना पाठीमागून त्यांच्या मानेत त्याने चाकू खुपसला. त्यामुळे संतोष हे क्षणात खाली कोसळले. त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वहायला लागल्या. हॉटेलमधील इतर कर्मचारी व ग्राहकांनी संतोष यांना तातडीने माई मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.२५ दिवसांपूर्वीच कामावरउमेश गिरी हा केवळ २५ दिवसांपूर्वीच या हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला लागला होता. त्यापूर्वी त्याची आणि हॉटेल चालक संतोष शेट्टी यांची ओळख नव्हती. संतोष यांनीच उमेशला हॉटेलमध्ये वेटर पदावर कामाला ठेवले होते. खून केल्यावरही हॉटेलमध्येच थांबलासंतोष याच्या मानेत चाकू खूपसून त्याचा खून केल्यावरही उमेश हा तेथून पळून गेला नाही की घाबरला नाही, तो शांतपणे तेथेच उभा राहिला, त्यानंतर पोलिसांनी त्याला तेथेच अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड