शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वनराज आंदेकर प्रकरण : वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला? आंदेकर गँगकडून कोवळ्या ’आयुष’चा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:57 IST

आंदेकर टोळीचा सदस्य कृष्णा आंदेकर यानेच दत्ता काळे याला आर्थिक मदत करून रेकी करण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात पाठवल्याचेही समोर आलं होतं.

पुणे - विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत गुंतलेल्या पुणे पोलिसांसमोर गुन्हेगारी टोळक्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. नाना पेठेतील मध्यवर्ती भागात शुक्रवारी रात्री अवघ्या १९ वर्षीय आयुष कोमकर याचा पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. आयुष हा गणेश कोमकर यांचा मुलगा होता. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला होता, त्यात गणेश कोमकर हा प्रमुख आरोपी होता. त्यामुळे आंदेकर गँगने सूड उगवत आयुषचा खून केला, अशी चर्चा सध्या पुण्यात जोर धरत आहे.दरम्यान, १ सप्टेंबर २०२४ रोजी वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता. त्यावरून आंदेकर टोळीतील अनेकांना अटक झाली. मात्र, हा खून आम्ही बदला घेऊनच संपवणार.. अशी चर्चा गुन्हेगारी विश्वात सुरू होती. तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी भारती विद्यापीठ परिसरात रेकी करणाऱ्या दत्ता काळे या तरुणाला अटक केली होती. या चौकशीत आंदेकर टोळी खुनाचा कट रचत असल्याचे उघड झाले होते.हल्ल्याची घटनाशुक्रवारी रात्री साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान आयुष कोमकर क्लासवरून परतला. तो आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभा असतानाच दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तूलातून सलग गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. परिसरात क्षणात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकच्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते यांच्या घराबाहेर रेकी करणाऱ्या दत्ता काळे या तरुणाला अटक केली होती. त्यातून खुनाचा कट समोर आला होता. आंदेकर टोळीचा सदस्य कृष्णा आंदेकर यानेच दत्ता काळे याला आर्थिक मदत करून रेकी करण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात पाठवल्याचेही समोर आलं होतं. पुढे आंदेकर टोळी वनराजच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं होतं.

सोमनाथ गायकवाडचा मुलगा, बायको आणि अनिकेत दूधभाते याचा भाऊ या टोळीच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात पुढे आंदेकर टोळीच्या आठ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आंदेकर टोळीला पिस्तूल पुरवल्याप्रकरणी कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीच्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली होती.. त्यामुळे मोठा कट उघडकीस आल्यामुळे पोलीसही निर्धास्त राहिले. आणि त्यानंतर आंदेकर टोळीने पुन्हा नाना पेठेत खुनाचा बदला खून करून घेतला.पोलिस तपास आणि पुढील कारवाईतपासात आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी या कटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही या टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या टिपू पठाण गँगमधील दोघांना अटक झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आंदेकर गँगचा शोध तीव्र केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड