शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: स्वारगेट परिसरात पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण;दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:52 IST

पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून तिघांना मारहाण केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. याप्रकरणी ...

पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून तिघांना मारहाण केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. याबाबत कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. सेवक मित्र मंडळाजवळ, कासेवाडी, भबानी पेठ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी केलेल्या मारहाणीत नायडू आणि त्यांचे दोन भाचे जखमी झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायडू आणि त्यांचे भाचे शंकरशेठ रस्ता परिसरातील धोबी घाट भागात असलेल्या स्मशानकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी नायडू यांनी आरोपींना दिलेले हातउसने पैसे परत मागितल्याने वाद झाला.

त्यानंतर आरोपींनी नायडू यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. नायडू यांच्याबरोबर असलेल्या भाच्यांनी मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी नायडू आणि भाच्यांवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Dispute over money leads to assault with pistol; two arrested.

Web Summary : In Pune, a money dispute escalated into assault with a pistol on Shankar Sheth Road. Two individuals were arrested for attempted murder after allegedly attacking three people, including Kanifnath Naidu, over unpaid debt. Police are investigating the incident.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या