सणसर : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत दहशत माजवल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सुनील शिंदे, अक्षय अंकुश जगताप, रवी गोरख जाधव, गौरव शिवाजी जगताप, किरण हनुमंत भोसले, राहुल विठ्ठल घुले, प्रशांत पांडुरंग जाधव, निखिल आजीनाथ पाटील व सचिन गोरख बालगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कालिदास जनार्दन खोमणे यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (दि. ७) दुपारी सुमारे पावणे दोनच्या सुमारास ऊस वाहतूक थकबाकीदाराशी कारखान्याचे अधिकारी चर्चा करत असताना, संबंधित नऊ जण चारचाकी वाहनांतून भरधाव वेगाने कारखान्याच्या आवारात घुसले. सुरक्षा कर्मचारी रुपेश चव्हाण व इतरांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी शिवीगाळ करत प्रशासकीय इमारतीत प्रवेश केला.
यानंतर त्यांनी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घालत “कारखाना फोडून टाकू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेत वापरलेल्या तीन चारचाकी वाहनांची पोलिसांनी जप्ती केली असून, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डूणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Nine individuals were booked for allegedly creating terror at Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory. They reportedly stormed the administrative building, verbally abused employees, and issued threats, leading to a tense atmosphere. Police seized three vehicles; investigation underway.
Web Summary : श्री छत्रपति सहकारी चीनी कारखाने में नौ लोगों पर आतंक फैलाने का मामला दर्ज किया गया है। आरोप है कि उन्होंने प्रशासनिक भवन में घुसकर कर्मचारियों को गाली दी और धमकी दी, जिससे तनावपूर्ण माहौल बन गया। पुलिस ने तीन वाहन जब्त किए; जांच जारी है।