शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Pune Crime : कोयता गँगची दहशत; वानवडीतील भैरोबानाला परिसरात नऊ वाहनांची तोडफाेड

By नम्रता फडणीस | Updated: November 22, 2024 16:13 IST

कोयते उगारून दहशत माजविण्याचा प्रयत्न

पुणे : वानवडीतील भैरोबानाला परिसरात टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड करीत कोयते उगारुन दहशत माजवली. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मयूर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भैरोबानाला परिसरात सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. गुुरुवारी दुपारी टोळी वस्तीत शिरली. त्यांच्याकडील कोयते आणि दांडके उगारुन टोळक्याने दहशत माजविली. या भागातील मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करुन टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ केली.या घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडले. तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जीवे मारु’, अशी धमकी देऊन टोळके पसार झाले. पसार होताना टोळक्याने या भागातील कालव्याजवळ लावलेली दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत. पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक