पुणे : जन्मदात्या आईच्या जीवावर मुलगा उठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईला शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला आल्यानंतर दोन पोलिस मार्शल त्याठिकाणी गेले. आईला मारू नको, असे ते समजावत होते. मात्र, मद्यपी मुलाने दोन्ही पोलिसांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या गणवेशाची बटणे तोडली. आईला वाचविण्यासाठी आलेल्या पोलिस अंमलदारांना शिवीगाळ करून दमदाटी करणाऱ्या मुलाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
श्रेयश संजय कोराड (वय ३०, रा. फुलेनगर, येरवडा) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदाराने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फुलेनगर येथील वि. द. घाटे शाळेच्या शेजारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश काची यांना पोलिस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, मुलगा मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याच्या ५५ वर्षीय आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलिस तातडीने तेथे पोहोचले. श्रेयश कोराड याला समजावून सांगत असताना व आईला मारहाण करण्यापासून परावृत्त करत असताना श्रेयश याने फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडले. त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
सरकारी गणवेशाची बटणे तोडली. त्यांच्या मदतीला आलेल्या पोलिस अंमलदार धुगे यांनादेखील शिवीगाळ करून दमदाटी केली. या घटनेनंतर त्यांनी पोलिस मदत मागविली. तपास पथकाचे अंमलदार तेथे आल्यावर त्यांनादेखील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Web Summary : In Pune, a man attacked his mother and threatened police officers who intervened. He was arrested for assault and obstructing government officials from doing their duty. The incident occurred in Phulenagar, Yerwada after police received a call about the assault.
Web Summary : पुणे में एक व्यक्ति ने अपनी माँ पर हमला किया और हस्तक्षेप करने वाले पुलिस अधिकारियों को धमकी दी। उसे मारपीट करने और सरकारी अधिकारियों को उनके कर्तव्य का निर्वहन करने से रोकने के आरोप में गिरफ्तार किया गया। यह घटना येरवदा के फुलेनगर में हुई जब पुलिस को हमले की सूचना मिली।