शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण प्रकरण:पुणे रेल्वे स्थानकावरून बालकाची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:05 IST

बिहारमधील हाजीपूर येथून अपहरण करण्यात आलेल्या ७ महिन्यांच्या बालकाची पुणे रेल्वे स्थानकावरून सुखरूप सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे

पुणे : बिहारमधील हाजीपूर येथून अपहरण करण्यात आलेल्या ७ महिन्यांच्या बालकाची पुणे रेल्वे स्थानकावरून सुखरूप सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) पुणे पोलिस ठाणे यांच्यामार्फत २३ जून रोजी करण्यात आली.

याबाबत पुणे रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीआरपी हाजीपूर आणि विभागीय नियंत्रण कक्षामार्फत दिलेल्या निर्देशानुसार एका पुरुष आणि एका महिलेकडून हाजीपूर येथून बालकाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांची मोबाइल लोकेशन पुणे रेल्वे स्थानक परिसरात सापडल्याने, पुणे येथील आरपीएफला तत्काळ सूचना देण्यात आली.

सूचना मिळताच आरपीएफ पुणे ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली. विविध पथके तयार करून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात, विशेषतः फलाट क्रमांक ३ आणि महत्त्वाच्या प्रवेश व निर्गम मार्गांवर पथके तैनात करण्यात आली. तपासादरम्यान, दोन संशयित व्यक्ती फलाट क्रमांक ३ वर आढळले. त्यांना ताब्यात घेऊन आरपीएफ ठाणे, पुणे येथे चौकशीसाठी आणण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे मुन्ना कुमार राजभर (२४ , रा. कोपा समोता, छपरा, बिहार) आणि पूनम देवी (३० वर्षे, रा. दया छपरा, सिवान, बिहार) अशी सांगितली.

बालकाबाबत विचारले असता, त्यांनी कोणतीही कायदेशीर कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांचे व बालकाचे फोटो जीआरपी हाजीपूरला पाठविण्यात आले असता, हे दोघेही अपहरण प्रकरणात वॉंटेड असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पूनम देवीला अटक करण्यात आली आणि बालकाला सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आले. सद्य:स्थितीत दोघे आरोपी आणि बालक आरपीएफ पुणे ताब्यात आहेत. पीआरपी हाजीपूर येथून पोलिस पथक पुण्याकडे रवाना झाले असून, त्यांच्याकडे आरोपी व बालक यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सुपुर्द करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी