शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दुकानाची दोनदा विक्री; पुण्यातील बिल्डरविरोधात एक कोटींचा फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:00 IST

वानवडी परिसरातील एका व्यावसायिक संकुलातील दुकान खरेदीसाठी मोठी रक्कम अदा केली होती.

पुणे : शहरात रिअल इस्टेट व्यवहारातील फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. वानवडी पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकाविरोधात तब्बल एक कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुराणा लँडमार्क्स एलएलपी या कंपनीचे संचालक राजीव हिरालाल सुराणा (४०), राहुल हिरालाल सुराणा (४९, दोघे रा. रस्ता पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय तक्रारदाराने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वानवडी परिसरातील एका व्यावसायिक संकुलातील दुकान खरेदीसाठी मोठी रक्कम अदा केली होती. मात्र, संबंधित बिल्डरने हेच दुकान दुसऱ्या खरेदीदारालाही विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दुहेरी विक्रीमुळे तक्रारदाराची सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच वानवडी पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, करारनामे आणि आर्थिक देवाणघेवाणीची माहिती पोलिसांकडून तपासली जात असून, आणखी काही फसवणूक झाल्या आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Builder Booked for Fraudulently Selling Same Shop Twice

Web Summary : Pune builder booked for ₹1 crore fraud. He allegedly sold the same shop in Wanwadi twice, cheating a buyer. Police are investigating the double sale and other potential frauds.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रfraudधोकेबाजी