आळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी पती, सासू-सासरे, आई-वडील आणि मामासह एकूण सहा जणांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ मे २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. पीडित मुलगी १७ वर्षे २ महिन्यांची असताना, तिचे अल्पवय माहीत असूनही कुटुंबीयांनी संगनमताने तिचा विवाह लावून दिला. विवाहानंतर सासरी राहत असताना पतीकडून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले.या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. नुकतेच तिने एका मुलीला जन्म दिला असून, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. समाजातील बालविवाहासारख्या कुप्रथांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी संबंधित सर्व आरोपींविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Alandi: A minor tribal girl was forcibly married and abused. Police booked six, including the husband and parents, under POCSO after the victim became pregnant. Investigation underway.
Web Summary : आळंदी: एक नाबालिग आदिवासी लड़की का जबरन बाल विवाह किया गया और उस पर अत्याचार किया गया। पुलिस ने पति और माता-पिता सहित छह लोगों पर POCSO के तहत मामला दर्ज किया, पीड़िता गर्भवती हो गई। जांच जारी।